पर्रीकरांच्या मुलाने तिकिट मागितलं अन् भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले...

गोव्यात काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसला आहे.
पर्रीकरांच्या मुलाने तिकिट मागितलं अन् भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले...
Manohar Parrikar and Utpal ParrikarSarkarnama

पणजी : गोव्यात (Goa) काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीआधी (Assembly Election) भाजपला मोठा धक्का बसला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी पक्षाला थेट धमकी दिली आहे. पक्षाने तिकिट नाकारल्यास कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा जाहीर इशाराही त्यांनी दिला आहे. यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिले आहे.

पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री होते तसेच, संरक्षण मंत्रीही होते. त्यांच्या मृत्यूने गोव्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. पर्रीकर हे तब्बल 25 वर्षे पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. आता मतदारसंघावर त्यांचे पुत्र उत्पल यांनी दावा सांगितला आहे. त्यांनी यासाठी पक्ष नेतृत्वाला थेट धमकीवजा इशारा दिला आहे. यामुळे गोवा भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

यावर बोलताना गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी उत्पल पर्रीकर यांची भेट झाल्याचे कबूल केले आहे. मात्र, तिकिट वाटपावर चर्चा झाल्याचा इन्कार केला आहे. ते म्हणाले की, पक्षाच्या तिकिटावर कोणाही दावा करू शकतो. याचा अंतिम निर्णय पक्षाच्या संसदीय मंडळात होत असतो. स्थानिक पातळीवर याबाबत कोणताही निर्णय घेतला जात नाही. माझी नुकतीच उत्पल पर्रीकरांशी भेट झाली पण तिकिटाबाबत काहीही चर्चा झाली नाही.

Manohar Parrikar and Utpal Parrikar
राज्यपाल भडकले अन् म्हणाले, सरकार माझं ऐकतच नाही!

पणजीच्या जागेवर सध्या बाबूश मोन्सेरात आहेत. मोन्सेरात यांनी 2017 मध्ये विधानसभा निवडणूक तेथून लढवली होती परंतु, त्यांचा पराभव झाला होता. नंतर 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या 10 नेत्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. नंतर पर्रीकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत त्यांनी पणजीवर विजय मिळवला होता. ते आता जागेवर पुन्हा दावा सांगत आहेत. याला उत्पल पर्रीकर यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे त्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी करीत पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे.

Manohar Parrikar and Utpal Parrikar
मनोहर पर्रीकरांचे पुत्र बंडाच्या तयारीत; भाजपला थेट धमकीवजा इशारा

याबाबत उत्पल पर्रीकर म्हणाले आहेत की, पणजीमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आधीच मी पक्ष नेतृत्वासमोर व्यक्त केली आहे. तेथून मला तिकिट मिळेल, याची मला खात्री आहे. मनोहर पर्रीकर यांना आयुष्यात प्रत्येक गोष्ट सहजपणे मिळाली नव्हती. मलाही या गोष्टी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. पक्षाने मला तिकिट न दिल्यास मला कठोर निर्णय घ्यावा लागेल. माझ्यावर प्रत्यक्ष अशी वेळ येईल त्यावेळी मी जनतेचे ऐकेन.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in