भाजपला मोठा धक्का! विधानसभा अध्यक्षांची ऐनवेळी निवडणुकीतून माघार

गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) तोंडावर भाजपला (BJP) मोठा झटका बसला आहे.
BJP
BJPSarkarnama

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) तोंडावर भाजपला (BJP) मोठा झटका बसला आहे. भाजप नेते व विधानसभा अध्यक्ष राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांनी ऐनवेळी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. डिचोली मतदारसंघाचे आमदार असलेल्या पाटणेकरांनी मैदानात उतरण्यास नकार दिल्याने निवडणुकीच्या तोंडावर भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

पाटणेकर यांनी निवडणुकीत उभे न राहण्यासाठी प्रकृतीचे कारण पुढे केले आहे. विधानसभा अध्यक्षांनीच निवडणूक लढण्यास नकार दिल्याने भाजपवर नामुष्की ओढवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मी पक्षाला कळवले आहे. पक्ष डिचोलीमधून ज्या उमेदवाराला उभे करेल त्याला मी पूर्णपणे साथ देईन.

पाटणेकर यांनी 2002 पासून तीन वेळा डिचोली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी 2012 मध्ये भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचा पराभव झाला होता. पाटणेकर यांनी विधानसभा निवडणूक लढण्यास नकार दिल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपचे सरचिटणीस सतीश धोंड यांनी दुसरा उमेदवार शोधण्यास सुरवात केली आहे. गोव्यात विधानसभेसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होत आहे तर निकाल 10 मार्चला लागणार आहे.

BJP
मोठी बातमी : अनिल देशमुखांना न्यायालयाचा दणका

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. गोव्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आहे. राज्यात भाजपला गळती लागल्याचे चित्र आहे. नुकताच मंत्री मायकल लोबो यांनी मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याचबरोबर प्रवीण झांटे यांनीही आमदारकीची राजीनामा दिला आहे. प्रवीण झांटे हे राज्यातील मोठे उद्योगपती आहेत.

BJP
भाजपचा मुहूर्त निघत नसताना गोव्यात काँग्रेसने मारली बाजी!

गोव्याचे नगरविकास मंत्री आणि भाजपचे आमदार मिलिंद नाईक यांनी मागील महिन्यातच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने (Congress) केला होता. त्यानंतर भाजप नेत्या अलिना सलडान्हा यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश करत उमेदवारीही मिळवली आहे. त्यांच्यानंतर कार्लोस अल्मेडा या भाजप आमदाराने राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com