भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसने टाकला डाव; निकालापूर्वीच केली मोठी घोषणा

Goa | Goa assembly election | Congress : एक्झिट पोलच्या आकड्यांनंतर काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण
Congress-BJP
Congress-BJPSarkarnama

पणजी : काल शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार गोव्यामध्ये काँग्रेसचे (Congress) पारडं जड असल्याचे दिसून येत आहे. मात्र अंतिम निकाल १० मार्च रोजी स्पष्ट होणार आहे. पण त्यापूर्वीच एक्झिट पोलच्या (Exit polls) आकडेवारीनुसार काँग्रेसने हालचालीला सुरुवात केली आहे. काँग्रेसने भाजपविरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करत काँग्रेस गोव्यात आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) आणि तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress Party) सोबत युती करण्यास तयार आहे, अशी घोषणा केली आहे.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे गोवा डेस्क प्रभारी दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) यांनी म्हटलं आहे की, जो पक्ष भाजपच्या विरोधात असेल त्या पक्षाशी आम्ही संपर्क साधणार आहोत. मी कोणत्याही एका पक्षाबद्दल बोलत नाही. परंतु जो पक्ष भाजपला पाठिंबा देऊ इच्छित नाही, त्यांना आम्ही सोबत घेण्यास तयार आहोत.

Congress-BJP
इंदूरीकरांनी दिला शाप; 'त्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील...'

राव पुढे म्हणाले, निवडणुकीतील प्रचारादरम्यान आप आणि टीएमसीने (TMC) आमच्यावर विविध प्रकारचे आरोप केले. परंतु निकालानंतर आम्ही कोणासोबत जायचे याबाबत लवकरच निर्णय घेवू. भाजपला पाठिंबा न देणाऱ्या पक्षांसोबत आम्हाला काम करायचे आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेससोबत युती केलेला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षही काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Congress-BJP
NIA चे पुण्यात छापे; कश्मिरी दहशतवादाचा संबंध आणि साहित्य आढळल्याने खळबळ

निकालापूर्वी तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना या पक्षांनी काँग्रेससोबत युती करण्याची आणि भाजपविरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. मात्र काँग्रेसने कोणत्याही पक्षाला प्रतिसाद दिला नव्हता. दरम्यान, २०१७ साली ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेत सर्वाधिक १७ जागा जिंकून देखील सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरला होता. तर, १३ जागा जिंकणाऱ्या भाजपने म.गो.प., गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष आमदारांसह आघाडी सरकार स्थापन केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com