2500 कोटी द्या, मुख्यमंत्री व्हा : भाजप आमदाराला ऑफर; पक्षात खळबळ

दिल्लीहून एक व्यक्ती ही ऑफर घेऊन आल्याचा ज्येष्ठ आमदाराचा दावा!
BJP
BJPSarkarnama

बंगळूर : दिल्लीहून आलेल्या एका व्यक्तीने मुख्यमंत्रिपदासाठी माझ्याकडे २ हजार ५०० कोटी रुपयांची मागणी केली होती, अशी स्फोटक वक्तव्ये करीत कर्नाटकातील भाजपचे (Karnataka BJP) ज्येष्ठ आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ (MLA Basangouda Patil) यांनी राजकीय वर्तुळात धमाल उडवून दिली आहे. बेळगाव (Belgaum) जिल्ह्यातील रामदुर्ग येथे कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, यत्नाळ यांच्या वक्तव्याची एसीबीमार्फत (लाचलुचपत प्रतिबंध विभाग) चौकशी करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी केली आहे.

लिंगायत पंचमसाली समाजाच्या अधिवेशनात शुक्रवारी (ता. ६) बोलताना यत्नाळ यांनी दावा केला की, नवी दिल्लीतील काही लोक माझ्याकडे २,५०० कोटी रुपये दिल्यास मुख्यमंत्री करण्याची ऑफर घेऊन आले होते. त्यांनी आपल्याला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचे आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटींचे आश्‍वासनही दिले होते, असे ते म्हणाले.

BJP
निवडणूक आयोगाची लगबग : 216 नगरपालिका, 25 ZP साठी मोठा आदेश

ते म्हणाले की, ‘ती ऑफर आल्यावर मी म्हणालो, इतकी रक्कम मी कुठे ठेवू शकलो असतो? खोलीत किंवा गोडाऊनमध्ये ठेवता येईल का?’ समाजातील लोक अशा आश्‍वासनांना बळी पडतात. त्यांच्या राजकीय भवितव्याला धक्का लागू नये. राजकारणात अशा घटना घडत राहतात. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे. निवडणुका जवळ आल्या की सर्व प्रकारचे ‘उपक्रम’ समोर येतात. काही जण सामूहिक विवाह करतात किंवा विधानसभा निवडणूक लढवण्याच्या महत्त्वाकांक्षेने १५१ जोडप्यांचे लग्न लावून देतात. नोटबुक वाटप, ‘ताली भाग्य’ आणि इतर उपक्रमही होताना दिसतात, असेही ते म्हणाले.

‘मी पैसे देत नाही. तरीही लोक मला मतदान करतात. कारण, त्यांना माहीत आहे की मी तोंडावर ओरडत असलो तरी, कोणाच्या पाठीत वार करत नाही. मी कोणाला त्रास देत नाही. माझ्या विधानसभा मतदारसंघात मुस्लिमांची एक लाख मते आहेत. तर इतर सर्व समाजाची मिळून १.५० लाख मते आहेत, असे यत्नाळ म्हणाले.

BJP
त्या व्हायरल पत्रामुळे कृष्ण प्रकाश व्यतिथ : मी केलेल्या कारवाईमुळे नाखूष व्यक्तींचा हा उद्योग!

यत्नाळ यांनी रामदुर्ग येथे समाजासाठी २ अ आरक्षणाची मागणीही केली. त्याचा व्हिडीओ शुक्रवारी व्हायरल झाला. लिंगायत पंचमसाली समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत ते म्हणाले की, ‘एका स्वामीने १० कोटी रुपये स्वीकारले आहेत आणि ते ‘श्री गुरू बसव लिंगाय नमः’चा जप करत आहेत. स्वामीजींचा एक गट बोगस आहे आणि फसवणूक करणाऱ्या कंपन्यांप्रमाणे तो काम करत आहे, असेही ते म्हणाले.

काँग्रेसची चौकशीची मागणी
बसवराज पाटील-यत्नाळ यांनी दिलेल्या माहितीची भ्रष्टाचार निर्मूलन पथकाद्वारे एफआयआर दाखल करून चौकशी करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केली आहे. यत्नाळ हे काही सामान्य व्यक्ती नाहीत. ते भाजपचे मोठे नेते आहेत. आमदार, खासदार व केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी कार्य केले आहे. त्यांचा आरोप गांभीर्याने घ्यायला हवा. मुख्यमंत्रिपदासाठी अडीच हजार कोटींची मागणी हा गंभीर विषय आहे. याबाबत तातडीने चौकशी झाली पाहिजे, असा त्यांनी आग्रह केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in