देव करो अन् आपले ३०० खासदार निवडून येवोत ; गुलाम नबी आझादांचा घरचा आहेर

२०२४ च्या निवडणुकीत कॉग्रेसचे ३०० खासदार असतील, असे मला वाटत नाही,'' अशा शब्दात कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (ghulam nabi azad) यांनी कॉग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
ghulam nabi azad
ghulam nabi azadsarkarnama

राजौरी : ''मी मुख्यमंत्री होण्याची सध्याची परिस्थिती नाही. मी खोटं आश्वासन देणार नाही, कलम ३७० लोकसभेत बहुमताने हटवलं आहे. ते पुन्हा आणण्यासाठी ३०० खासदारांची गरज आहे. पण सध्या कॉग्रेसची जवळ काहीही नाही. २०२४ च्या निवडणुकीत कॉग्रेसचे ३०० खासदार असतील, असे मला वाटत नाही,'' अशा शब्दात कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (ghulam nabi azad) यांनी कॉग्रेसला घरचा आहेर दिला आहे.

''निवडणुका होतील, तेव्हा होतील पण, जात, धर्माच्या नावावर मते न मागता, विकासाच्या नावावर मते मागा, आपल्या भागातील नेता निवडताना त्याने केलेल्या विकासावर भर द्या, अशा नेत्यांना पुढे आणा जे विकासाचा मुद्या पुढे आणू शकतील,'' असे गुलाम नबी आझाद यांनी सांगितलं. गुलाम नबी आझाद (Gulab Nabi Azad) हे सध्या पुंछ आणि राजौरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

''मी तुम्हाला (कलम ३७० पुन्हा लागू करण्याचे) आश्वासन देऊ शकत नाही कारण काहीही झाले तरी त्यासाठी २०२४ मध्ये ३०० खासदार निवडून येणं गरजेचे आहे. देव करो आणि आपले ३०० खासदार निवडून येवोत. पण सध्याची परिस्थिती पाहता हे होईल असं वाटतं नाही. त्यामुळेच मी तुम्हाला खोटी आश्वासनं देत नाहीय आणि कलम ३७० बोलणं टाळतोय’ आपल्याकडे ३०० खासदार कधी असणार,'' असा सवाल आझाद यांनी उपस्थित केला.

ghulam nabi azad
विनय सिंहला उच्च न्यायालयाकडून दिलासा ; परमबीर सिहांच्या आशा पल्लवीत

गुलाम नबी आझाद यांच्या या वक्तव्यावरुन नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की,’सर्वोच्च न्यायालयाने हे (कलम ३७० चं) प्रकरण हाती घेण्यापूर्वीच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पराभव स्वीकारला आहे.’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com