गुलाम नबी आझादांनी केली नवीन पक्षाच्या नावाची घोषणा; झेंड्याचेही अनावरण

गुलाम नबी आझाद हे ता. २६ ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षातून बाहेर पडले हेाते.
Ghulam Nabi Azad
Ghulam Nabi AzadANI

जम्मू-काश्मीर : काँग्रेस (Congress) पक्षापासून फारकत घेतलेले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी आज (ता. २६ सप्टेंबर) अखेर नव्या पक्षाची (New Party) घोषणा केली आहे. डेमोक्रॅटिक आझाद पक्ष असं त्यांच्या नव्या पक्षाचे नाव असणार आहे. आगामी जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणूक त्यांचा पक्ष लढविण्याची शक्यता आहे. (Ghulam Nabi Azad announced New Party Name)

Ghulam Nabi Azad
सपाटेप्रकरणी राष्ट्रवादीने बोलावली बैठक; अंतर्गत वादावरही अजितदादा घेणार झाडाझडती

गुलाम नबी आझाद हे ता. २६ ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षातून बाहेर पडले हेाते. त्यावेळी त्यांनी आपण जम्मू काश्मीरमध्ये नवीन पक्ष स्थापन करणार असल्याचे जाहीर केले होते, त्यानुसार आझाद यांनी आज आपल्या पक्षाच्या नावाची घोषणा केली आहे. त्यांच्या पक्षाचे नाव हे डेमोक्रॅटिक आझाद पक्ष असं असणार आहे.

नवीन पक्षाची घोषणा करताना आझाद म्हणाले की, आमच्या नवीन पक्षासाठी सुमारे १५०० नावे आम्हाला उर्दू, संस्कृतमध्ये पाठवण्यात आली होती. माझ्या पक्षाचे नाव हे लोकशाही, शांततापूर्ण आणि स्वतंत्र असावे अशी इच्छा होती. त्यानुसार डेमोक्रॅटिक आझाद पक्ष असे नव्या राजकीय पक्षाचे नाव ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी त्यांच्या नव्या 'डेमोक्रेटिक आझाद पार्टी'च्या ध्वजाचेही अनावरण केले. तीन रंग असणारा त्यांचा पक्षाचा झेंडा आहे. त्यात निळा, पांढरा आणि पिवळा (मोहरी) यांचा समावेश आहे. त्याबाबत बोलताना आझाद म्हणाले की, मोहरीचा (पिवळा) रंग सर्जनशीलता आणि विविधतेत एकता दर्शवतो. पांढरा रंग हा शांतता दर्शवतो आणि निळा स्वातंत्र्य, मोकळी जागा, कल्पनाशक्ती आणि समुद्राच्या खोलीपासून आकाशाच्या उंचीपर्यंतच्या मर्यादा दर्शवतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com