टीम इंडियाने 36 वरून विजय मिळवला, काँग्रेसकडे तर 44...

टीम इंडियाच्या अॉस्ट्रेलियाविरूध्दच्या कसोटी मालिकेतील विजयाचा जल्लोष देशभर सुरू आहे. पण काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलेले संजय झा यांनी मात्र या विजयावरून काँग्रेसला टोला लगावला आहे.
Get up shake off the dust and dirt and fight And stop moping and crying about the past says sanjay jha
Get up shake off the dust and dirt and fight And stop moping and crying about the past says sanjay jha

नवी दिल्ली : टीम इंडियाच्या अॉस्ट्रेलियाविरूध्दच्या कसोटी मालिकेतील विजयाचा जल्लोष देशभर सुरू आहे. पण काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलेले संजय झा यांनी मात्र या विजयावरून काँग्रेसला टोला लगावला आहे.

'टीम इंडिया 36 धावांवर आऊट झाली होती. पण करिष्मा दाखवत विजय मिळविला. माझ्या जुन्या पक्षासाठी हा संदेश आहे. आम्हाला 44 (2014 च्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या जागा) मिळाल्या आहेत. उठा, धूळ झटकून लढण्यासाठी सज्ज व्हा. भुतकाळाविषयी रडणे थांबवा', असे ट्विट करत त्यांनी काँग्रेसला सुचक संदेश दिला आहे.

पहिल्या कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पुढील दोन्ही कसोटीत धूळ चारण्याचा पराक्रम केला. या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही टीम इंडियाच्या शिलेदारांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. पण टीम इंडियाच्या या कामगिरीत काँग्रेस पक्षासाठीही सुचक संदेश असल्याचे ट्वीट झा यांनी केले आहे. विशेष म्हणजे झा यांना पक्षाविरोधात वक्त्व्य केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. ते काँग्रेसचे प्रवक्ते होते. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 44 जागांवर समाधान मानावे लागले होते. तसेच 2019 च्या निवडणुकीत जागांमध्ये किंचित वाढ झाली असली तरी पक्षाचा दारूण पराभव झाला. त्यावरून झा यांनी ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या पहिल्या कसोटीशी काँग्रेसची तुलना केली आहे.

पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा संघ केवळ 36 धावांमध्ये बाद झाला होता. पण त्यानंतरच्या दोन्ही कसोटीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करून संघाने विजयश्री खेचून आणली. या दोन विजयाचा संदर्भ देत झा यांनी काँग्रेससाठी हा प्रेरणादायी संदेश असल्याचे म्हटले आहे. भुतकाळाविषयी रडणे सोडून द्या. उठा, धूळ आणि घाण झटकून लढण्याची हिंमत दाखवा, असेही त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांकडून टीम इंडियाला शुभेच्छा...

ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या यशाने आम्ही सर्वजण आनंदी आहोत. त्यांच्यातील उर्जा व महत्वाकांक्षा सतत दिसून आली. उल्लेखनीय धैर्य आणि दृढ संकल्प पाहायला मिळाला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघातील खेळाडूंना विजयाच्या शुभेच्या दिल्या.

टेनिस क्रिकेटला मान्यता देऊ

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भारतीय संघाला विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पक्षाची सत्ता आल्यानंतर टेनिस क्रिकेटला मान्यता दिली जाईल, असे ट्विटरवर त्यांनी जाहीर केले.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com