German Magazine Controversial Cartoon :
German Magazine Controversial Cartoon :Sarkarnama

German Magazine Cartoon : भारतीय लोकसंख्येवर जर्मनीच्या मासिकामध्ये वादग्रस्त व्यंगचित्र; नेटकऱ्यांच्या रडारवर...

German Magazine Controversial Cartoon : नेटकऱ्यांनी या मासिकावर आता निशाणा साधला आहे.

German Magazine Controversial Cartoon : भारत हा नुकताच जगातला सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश बनला आहे. याच संदर्भाने जर्मनीतल्या डेर स्पीगल मासिकाने खिल्ली उडवत एक वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित केले आहे. भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकत असल्याचा, या व्यंगचित्रातून सुचविण्यात आले आहे.

यानंतर सोशल मीडियावर वाद सुरू आहे. नेटकऱ्यांनी या मासिकावर आता निशाणा साधला आहे. डेर स्पीगल स्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्या वर्णद्वेषी विचारांना लपवू शकत नाही, अशी या मासिकावर टीका केली जात आहे. (Controversial cartoon in German magazine on Indian population)

German Magazine Controversial Cartoon :
RSS News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नवा नारा? हिंदुत्वाऐवजी...; वृंदावन येथील मंथन शिबिरानंतर मोठे संकेत

काय आहे नेमकं व्यंगचित्रात?

या वादग्रस्त व्यंगचित्रात दोन रेल्वे गाड्या आहेत. एक भारताची जुन्या पद्धतीची रेल्वे दाखवण्यात आली आहे. ती प्रवाशांनी तुडूंब भरली आहे. तर गाडीच्या टपावरही लोक उभे आहेत. यामध्ये भारताचा तिरंगा ध्वज घेऊन लोक बसलेले आहेत. तर शेजारच्या लोगमार्गावरून चीनची बुलेट ट्रेन धावताना दिसत आहे. या ट्रेनमध्ये दोनच चालक आहेत.

व्यंगचित्रातून चीनचा (China) तांत्रिक विकास दाखवलं आहे. तर भारताला (India) सोयीस्कररीत्या गरीब दाखवले आहे.भारतात पायाभूत सुविधांचा अभाव दाखवण्याचा जाणूनबुजून केला आहे. संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी इतकी झाली. तर चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी इतके आहे.

German Magazine Controversial Cartoon :
Aamir Khan On Mann Ki Baat : 'मन की बात'मध्ये येणार 'परफेक्शनिस्ट' खान; पंतप्रधानांचं तोंडभरून कौतुक..

भारताच्या मंत्र्यांचा संताप :

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या व्यंगचित्रावर सडेतोड उत्तर दिले आहे. पुढील काही वर्षांमध्ये भारताची लोकसंख्या भारतीची अर्थव्यवस्था जर्मनीपेक्षा खूप मोठी असेल, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, "प्रिय डेर स्पीगल व्यंगचित्रकार भारत देशाची खिल्ली उडवण्याचा तु्मचा प्रयत्न आहे, पण.. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाच्या भारताविरुद्ध पैज लावणे स्मार्टपणा नाही, काहीच वर्षांमध्ये भारत देशाची अर्थव्यवस्था जर्मनीपेक्षा ही मोठा असेल.."

काही भारतीयांनी म्हंटले की कार्टून योग्य :

काही भारतीय लोकांकडून हे व्यंगचित्राचा आशय योग्य असल्याचे म्हंटले आहे. लाखो भारतीय नागरिक विविध सणांच्या वेळी घराकडे जातात. त्यामुळे काही गाड्या या कार्टूनमध्ये दाखवल्याप्रमाणेच दिसून येतात, असेही काही भारतीय नेटकऱ्यांनी म्हंटले आहे.

चीनपुढे नमते घेणे हा त्यांचा उद्देश :

भारताचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनीही या संदर्भात प्रतिक्रीया दिली आहे. हा प्रकार वर्णद्वेषी असल्याचे गुप्ता यांनी म्हंटले आहे. डेर स्पीगलने भारताचे केलेले चित्रण हे वास्तवाच्या विपरित असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भारताला डिवचून चीनपुढे नमते घेण्याचा नमते घेणे हात्यांचा मानस आहे. न्यूयॉर्क टाईम्सने भारताचे यशस्वी मंगळ यानची खिल्ली उडवली होती, जर्मनीचा हा प्रकार त्याहीपेक्षा वाईट आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in