मोठी बातमी : सरसेनाध्यक्ष रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचं नेमकं कारण आलं समोर

राजनाथसिंह यांनी रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची तिन्ही सैन्य दलांकडून चौकशी करण्याचा आदेश दिला होता.
मोठी बातमी : सरसेनाध्यक्ष रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचं नेमकं कारण आलं समोर
Bipin Rawat and Helicopter crashSarkarnama

नवी दिल्ली : सरसेनाध्यक्ष (CDS) जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. या अपघाताबद्दल वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथसिंह (Rajnath Singh) यांनी अपघाताची तिन्ही सैन्य दलांकडून चौकशी करण्याची घोषणा लोकसभेत केली होती. आता हा अपघात वैमानिकाच्या चुकीमुळे घडला आहे, असा निष्कर्ष चौकशीत समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हवामानातील अचानक बदलामुळे वैमानिकामुळे हेलिकॉप्टर ढगांमध्ये गेले. यामुळे हेलिकॉप्टरची दिशा भरकटली आणि ते कंट्रोल्ड फ्लाईट इनटू टेरेनमध्ये (सीएफआयटी) गेले. यामुळे हेलिकॉप्टर कोसळले, असे चौकशीत समोर आले आहे. फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर तसेच, साक्षीदारांचे जबाब यातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या माहितीनुसार, वैमानिकाचे नियंत्रण असताना हेलिकॉप्टर जमीन, पाणी अथवा इतर अडथळ्यांना धडकून झालेल्या अपघाताला सीएफआयटी म्हणतात. रावत यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर हे सुरक्षित होते आणि अपघात घडला त्यावेळी बिघडलेले नव्हते. त्यावर वैमानिकाचे नियंत्रण होते. या अपघाताला धुकेही कारणीभूत असल्याचे समोर येत आहे.

Bipin Rawat and Helicopter crash
कारमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत केंद्रीय मंत्री गडकरींनी घेतला मोठा निर्णय

जनरल बिपिन रावत हे 8 डिसेंबरला तमिळनाडूच्या निलगिरी पर्वत रांगेतील डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन या ठिकाणी तिथले प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जात होते. जनरल रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका आणि इतर 10 जणांना घेऊन एमआय-17व्ही5 हे हेलिकॉप्टर जात होते. तमिळनाडूतील सुलूर हवाई तळावरून ते कोईमतूर येथील वेलिंग्टन येथील डिफेन्स स्टाफ सर्व्हिसेस कॉलेजमध्ये जात होते. त्यावेळी या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. यातील 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हवाई दलाने दिली होती.

Bipin Rawat and Helicopter crash
धक्कादायक : ब्रिटनच्या युवराजांच्या अंत्यविधीआधी पंतप्रधानांच्या घरी झाली दारूपार्टी

लोकसभेत बोलताना राजनाथसिंह यांनी रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली. होती. त्याचवेळी त्यांनी तिन्ही सैन्य दलांकडून या दुर्घटनेची चौकशी करण्याचा आदेश दिल्याचेही सांगितले होते. या चौकशीचे नेतृत्व हवाई दलाचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चिफ ट्रेनिंग कमांड एअर मार्शल मानवेंद्र सिंह हे करीत आहेत. ते स्वत:ही हेलिकॉप्टर पायलट आहेत. या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा ब्लॅकबॉक्स सापडला होता. ब्लॅकबॉक्ससाठी अपघात घडलेल्या ठिकाणापासून 300 मीटर ते 1 किलोमीटर परिसरात शोध घेण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in