तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवानिशी संपवू! खासदार गौतम गंभीरला पुन्हा धमकी

याआधी २०१९ मध्ये गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.
तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवानिशी संपवू! खासदार गौतम गंभीरला पुन्हा धमकी
bjp mp gautam gambhirSarkarnama

दिल्ली : पूर्व दिल्लीचे भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीर यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅन्ड सीरिया, कश्मीर या दहशतवादी संघटनेकडून ही धमकी मिळाली आहे. धमकीनंतर गंभीर यांच्या आणि घराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याची माहिती मध्य दिल्लीच्या उपायुक्त श्वेता चौहान यांनी दिली आहे. याआधी ही २०१९ मध्ये एका आंतरराष्ट्रीय फोन नंबरवरुन गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरला आयएसआयएस, कश्मीर नावाच्या ईमेल आयडीवरुन हत्येच्या धमकीचा ई-मेल आला आहे. यानंतर गंभीर यांचे खाजगी सचिव गौरव अरोरा यांच्याकडून सेंट्रल दिल्ली पोलिसांना लेखी तक्रार देण्यात आली आहे. गौरव अरोरा यांनी सांगितले की, रात्री ९ वाजून ३२ मिनीटांनी हा धमकीचा मेल मिळाला आहे. यात तुला आणि तुझ्या परिवाराला जीवानिशी मारु असे लिहीण्यात आले आहे. या तक्रारीनंतर गंभीर यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

bjp mp gautam gambhir
महाराष्ट्रातही राजस्थान पॅटर्नचे संकेत; पटोलेंचे मंत्रिमंडळात आगमन होणार?

२०१९ मध्ये मिळाली होती धमकी...

याआधी ही २०१९ मध्ये एका आंतरराष्ट्रीय फोन नंबरवरुन गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यावेळी गंभीर यांनी दिल्लीतल्या शाहद्रा शहराच्या पोलीस उपायुक्तांना पत्र लिहून या घटनेची तक्रार केली होती. मला आणि माझ्या परिवारातील सदस्यांना आंतरराष्ट्रीय फोन नंबरवरुन सातत्याने हत्येच्या धमक्या येत आहेत. तुम्ही कृपया या प्रकरणात लक्ष घालून तक्रार दाखल करुन घ्या. तसेच मला आणि माझ्या कुटुंबाला सुरक्षा प्रदान करा, अशी विनंती गंभीर यांनी या पत्रात केली होती.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in