दरवाढीचा उच्चांक तरीही गॅस कनेक्शनमध्ये दुपटीने वाढ....

अलीकडे केंद्र सरकारने central Government गॅस सिलिंडर Gas cylinder स्वस्त केला. पण, ती २०० रूपयांची सूट सामान्यांसाठी नसून फक्त उज्वला योजना Ujjwala yojana लाभार्थींसाठी आहे.
Minister Hardipsing Puri
Minister Hardipsing Purisarkarnama

नवी दिल्ली : देशात २०१४ नंतर स्वयंपाकाच्या गॅस कनेक्शन धारकांची संख्या दुपटीहून अधिक वाढल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरवाढीने उच्चांक गाठला असताना दुसरीकडे गॅस कनेक्शन धारकांचा आकडा वाढत आहे. २०१४ नंतर देशात नवीन गॅस घेणारांची संख्या साडेचौदा कोटींवरून ३० कोटी ३९ लाखांवर पोहोचली आहे, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज सांगितले.

आगामी काळात जास्तीत जास्त देशवासीयांना पाईपलाईनद्वारे स्वयंपाकाच्या गॅसचा (पीएनजी) पुरवठा करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने समोर ठेवले आहे. २०१४ मध्ये ४१० रूपयांना असणारा गॅस सिलिंडर सध्या १००० रूपयांचा टप्पा ओलांडून गेल्याने गृहीणींचेही बजेट कोलमडले आहे. घरातील सिलिंडर पुरवून पुरवून वाचविण्याच्या दृष्टीने हॉटेलची किंवा रस्त्यावरील स्टॉलची वाट धरू इच्छिणाऱ्या सर्वसामान्यांना बाहेर वडापावपासून राईस प्लेटपर्यंत काही खाणेही जिवावर येण्याची परिस्थिती आहे.

Minister Hardipsing Puri
मी पंतप्रधान नाहीच, केवळ १३० कोटी जनतेचा प्रधानसेवक : नरेंद्र मोदी

अलीकडे केंद्र सरकारने गॅस सिलिंडर स्वस्त केला. पण, ती २०० रूपयांची सूट सामान्यांसाठी नसून फक्त उज्वला योजना लाभार्थींसाठी आहे. गॅस सिलिंडरची ही दरवाढ किती वाढेल याचा अंदाज कोणालाच नाही. मागच्या ८ वर्षांत गॅस सिलिंडरच्या व पाईपलाईनद्वारे येणाऱ्या गॅसच्याही दरांत दुपटीहून जास्त वाढ झाली त्याच काळात सिलिंडर धारकांची संख्याही वाढली असे केंद्राने म्हटले आहे.

Minister Hardipsing Puri
इंधनदरवाढ : मोदी-ठाकरे आमनेसामने ; आर्थिक बाबतीत केंद्राकडून सापत्नभावाची वागणूक

मंत्री पुरी यांनी सांगितले की, २०१४ मध्ये देशात २४ लाख पीएनजी कनेक्शनधारक होते. ही संख्या सध्या ९० लाख ९० हजार इतकी झाली आहे. या काळात देशातील सीएनजी केंद्रांच्या संख्येतही ९३६ वरून ४००० पेक्षा जास्त इतकी वाढ झाली आहे. पुरी म्हणाले की, मागील ८ वर्षांच्या मोदी सरकारच्या काळात पेट्रोलमध्ये इथेथॉलचे मिश्रण करण्याचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले आहे. २०१४ मध्ये देशात पेट्रोलमध्ये एक पंचमांश टक्के इथेनॉलचे मिश्रण होत असे. २०२२ मध्ये हे प्रमाण ९.९ टक्के झाले असून आगामी काळात ते २० टक्क्यांवर नेण्याचे लक्ष्य सरकारने समोर ठेवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com