
Gangwar in Delhi Tihar Jail : देशातील प्रसिद्ध तिहार तुरुंगातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिहार जेलमध्येच गुंडांनी केलेल्या हल्ल्यात गँगस्टर टिल्लू ताजपुरिया या मारला गेला. या घटनेने तिहार जेल आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Gangwar in country's most secure Tihar Jail; Murder of gangster Tillu Tajpuria)
मिळालेल्या माहितीनुसार, तुरुंग क्रमांक 8 मध्ये बंद असलेल्या योगेश टुंडा नावाच्या कैद्याने तुरुंग क्रमांक 9 मध्ये बंद असलेल्या टिल्लूवर अचानक लोखंडी सळीने हल्ला केला आणि या हल्ल्यात टिल्लू गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने दिनदयाळ रुग्णायलात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (Gangwar in Delhi Tihar Jail)
तुरुंगातील गुंड योगेश टुंडा, राजेश बवानिया, दीपक तितार आणि जितेंद्र गोगी टोळीने टिल्लूवर हा प्राणघातक हल्ला केला. तर टोळीतील इतर लोकांनी त्याचा टिल्लूचा खून केला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण आज (२ मे) सकाळी साडेसहा वाजता डीडीयू रुग्णालयात त्याचे निधन झाले. या घटनेनंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Delhi Crime)
तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च सुरक्षा वॉर्डच्या तळमजल्यावर राहणारा टिल्लू ताजपुरिया याच्यावर गोगी टोळीतील दीपक, योगेश, राजेश आणि रियाझ खान या चार कैद्यांनी त्याच वॉर्डच्या पहिल्या मजल्यावर हल्ला केला. सकाळी 06.15 च्या सुमारास लोखंडी जाळी कापून.. चौघांनीही टिल्लूवर लोखंडी सळी हल्ला केला. या चार गुंडांना तुरुंग क्रमांक 9 च्या पहिल्या मजल्यावर ठेवण्यात आले होते. त्यांनी लोखंडी ग्रील कापून तळमजल्यावर पत्र्याच्या साहाय्याने उडी मारली. तेथे त्यांनी उच्च सुरक्षा कारागृहात बंदिस्त असलेल्या टिल्लूवर जीवघेणा हल्ला केला. (National news)
टिल्लू ताजपुरियावर हल्लेखोरांनी 40 ते 50 वार केले. जवळपास 10 मिनिटे त्याच्यावर लोखंडी सळीने हल्लेखोरांनी हल्ला केला. या झटापटील टिल्लूला वाचवायला गेलेल्या राम निवास नावाच्या आणखी एका कैद्यावरही या हल्लेखोरांनी हल्ला केला. यात राम देखील गंभीर जखमी झाला आहे.
हे चार हल्लेखोर - दीपक, योगेश, राजेश आणि रियाझ हे गोगी टोळीशी संबंधित होते. या टोळीची सध्याची सुत्रे दीपक बॉक्सरच्या हाती होती. दीपक बॉक्सरला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल टीमने मेक्सिकोमधून अटक करून भारतात आणले होते. तोही तिहारच्याच तुरुंगात आहे. दीपक बॉक्सर तुरुंगात गेल्यानंतर रोहित मोई आता गोगी टोळीची कमान सांभाळत आहे.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.