Asaram Bapu Case: आसाराम बापू दोन बहिणींवरील बलात्कार प्रकरणात दोषी,न्यायालय शिक्षा ठोठावणार

Molestation Case : 2013 मध्ये सुरतमधील दोन बहिणींची नारायण साई आणि त्याचे वडील आसाराम बापू या दोघांविरोधात बलात्काराची तक्रार दाखल...
Asaram Bapu
Asaram Bapu Sarkarnama

Asaram Bapu : स्वयंघोषित संत आसाराम बापूच्या सुरत येथील आश्रमात राहत असलेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार झाला, असं लहान बहिणीनं सांगितलं होतं. दुसरीकडे, मोठ्या बहिणीनं तक्रारीत आसारामवर बलात्काराचा आरोप केला होता. अहमदाबाद येथील आश्रमात आसारामनं तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचं पीडितेनं सांगितलं. दोन्ही बहिणींनी पिता-पुत्राच्या विरोधात दोन स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या होत्या.

यात गांधीनगर सत्र न्यायालयानं आसाराम बापूला 2013 मध्ये सुरतमधील (Surat) दोन बहिणींवर झालेल्या बलात्कार प्रकरणी दोषी ठरवलं आहे. बलात्कार प्रकरणी आसाराम बापू यांना आज ( दि.३१) शिक्षा सुनावली जाणार आहे.

Asaram Bapu
Nashik Graduate election; गोंधळामुळे पदवीधरांनी फिरवली मतदानाकडे पाठ!

गुजरातच्या गांधीनगर न्यायालयात 2013 मध्ये सुरत येथे झालेल्या दोन बहिणींवरील अत्याचार प्रकरणी सोमवारी (दि.30) सुनावणी झाली. यात न्यायालयानं आसाराम बापू यांना दोषी ठरवलं असून आज त्यांना शिक्षा ठोठावली जाणार आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणात आधीपासूनच आसाराम बापू (Asaram Bapu) हे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

2013 मध्ये सुरतमधील दोन बहिणींनी नारायण साई आणि त्याचे वडील आसाराम बापू या दोघांविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. 2002 ते 2005 दरम्यान नारायण साईने वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याचं अल्पवयीनं मुलीनं तक्रारीत म्हटलं होतं.

Asaram Bapu
MVA News : एकत्र लढलो तर २००, नाहीतर १५० जागा मिळतील; प्रकाश आंबेडकरांचा दावा

या प्रकऱणी आसारामची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती यांच्यासह या चार महिला अनुयायांनाही आरोपी करण्यात आलं होतं. परंतु, या सर्वांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. आसाराम बापू सध्या जोधपूर कारागृहात आहेत. तसेच आसाराम बापूचा मुलगा नारायण साईही या प्रकरणी आरोपी असून काही दिवसांपूर्वी त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

आसाराम बापू यांच्याकडून नुकताच न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यावेळी दाखल अर्जात आसाराम बापू हे मागील 10 वर्षांपासून तुरुंगात असून त्यांचं वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे. तसेच ते गंभीर आजारानं त्रस्त आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) त्याच्या जामीन अर्जावर सहानुभूतीपूर्वक विचार करून उपचारासाठी जामीन मंजूर करावा अशी विनंती करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com