'RSS' च्या संमतीनेच गडकरींचा पत्ता कट...

Nitin Gadkari News : 'जे राजकारणी लोकांना स्वप्ने विकतात, ते अपयशी ठरतात', असे गडकरी म्हणाले होते.
Union Minister Nitin Gadkari
Union Minister Nitin Gadkari Sarkarnama

नवी दिल्ली: भाजपचे (BJP) वरीष्ठ नेते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना पक्षाच्या संसदीय मंडळातून वगळण्याचा आश्‍चर्यकारक निर्णय हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) संमतीनेच घेण्यात आला. याबाबतची माहिती भाजपच्या काही वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे.

संघाच्या नेतृत्वाने गडकरी यांना पक्ष विपरीत भाष्य करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांना सावध केले होते. विरोधकांनी त्यांच्या वक्तव्यांचा वापर भाजप आणि केंद्रातील सरकारला अडचणीत आणण्यासाठी केला होता. गडकरींवर निराश झालेल्या संघाने भाजप नेतृत्वाला सूचित केले की, गडकरींना संसदीय मंडळातून काढून टाकण्यासह योग्य ती कारवाई करावी. सततच्या कठोर भूमिकेमुळे गडकरींवर आधीच नाराज झालेल्या भाजप नेतृत्वाला, त्यांना पक्षाच्या सर्वोच्च निर्णय घेणार्‍या मंडळातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यास यामुळे मदत झाली. (Nitin Gadkari News)

Union Minister Nitin Gadkari
Nitin Gadkari | भाजप नेते नितीन गडकरी यांचे वक्तव्य

केवळ पक्ष आणि संघटनेशी विसंगत विधानेच नव्हे तर त्यांनी सरकारला अडचणीत आणण्याऱ्या बातम्यांमध्ये प्रसिद्धी मिळवली. खासगीतही ते वारंवार बाहेर जात असत. त्यामुळे सरकार आणि पक्षाला अस्वस्थता निर्माण झाली होती. संघानेही अनेकदा त्यांच्या या वागण्यावर नाराजी व्यक्त केली होती. कारण त्यांना सल्ला देऊनही ते तशाच प्रकारची टीका करत आहेत," असे भाजपच्या वरिष्ठ सूत्राने सांगितले.

Union Minister Nitin Gadkari
Nitin Gadkari video : "अधिकाऱ्यांनी फक्त येस सर म्हणायचं", नितीन गडकरी

राजकारण "सत्ताकेंद्रित" झाले आहे, असे गडकरींनी विधान केले होते. सातत्याने स्वत: ला एक सर्वसमावेशक राजकारणी म्हणून प्रतिमा निर्माण केल्यामुळे पक्षाची नाराजी वाढत होती. 2019 मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारी दरम्यान गडकरी म्हणाले होते की, 'जे राजकारणी लोकांना स्वप्ने विकतात, परंतु ते प्रत्यक्षात आणण्यात अपयशी ठरतात.' त्यांचं हे वक्तव्य सामान्य वाटत असले तरी, याचा निर्णायक वेळी भाजप आणि मोदी सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधकांकडून वापर करण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com