गडकरींना चहासाठी ताटकळत बसावं लागलं अन् खासदार जाधवांनी विमानतळ प्राधिकरणाला सुनावल...

दोनदा चहा मागूनही मंत्री गडकरी यांना चहा लवकर मिळाला नाही. यामागचे कारण आता समोर आले आहे.
गडकरींना चहासाठी ताटकळत बसावं लागलं अन् खासदार जाधवांनी विमानतळ प्राधिकरणाला सुनावल...
Nitin GadkariSarkarnama

बंगळुरू : भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना एक कप चहासाठी (Tea) 15 मिनिटे ताटकळत बसावे लागले आहे. महाराष्ट्रातील अक्कलकोट येथून हेलिकॉप्टरने भगवान दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी गडकरी हे देवल-गाणगापूर इथं गेले होते. दर्शनानंतर ते विशेष विमानाने दिल्लीला जाण्यासाठी कलबुर्गी विमानतळावर आले. तेव्हा 15 मिनिटात त्यांनी दोनदा चहा मागीतला मात्र, तरी देखील त्यांना चहा लवकर मिळाला नाही. यामागचे कारण आता समोर आले आहे.

Nitin Gadkari
पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? पंतप्रधान मोदींनीच आता सुचवला उपाय

विमानतळावर गडकरी बसलेले असतांना त्यांनी 15 मिनिटात दोनदा चहा मागितला. मात्र, तरीही त्यांनी चहा काही लवकर मिळाला नाही. मात्र, त्यांना चहा मिळण्यास का उशीर झाला याचे कारण समोर आले आहे. मागितलेल्या चहाला कर्नाटकच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून सिक्युरिटी क्लिअरन्स देण्यात आला नसल्यामुळे गडकरींना चहा मिळाण्यास उशीर झाल्याचे कारणा सांगण्यात आले आहे. दरम्यान, गडकरींच्या स्वागतासाठी आलेले भाजपचे आमदार बी. जी. पाटील यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना चहा घेऊन येण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विमानतळ संचालक ज्ञानेश्वरराव यांनी नंतर सांगितलं की, विमानतळाच्या कॅन्टीनमधून चहाची व्यवस्थाही करण्यात आली होती, मात्र, तेव्हा कर्नाटक राज्य औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सिक्युरिटी क्लिअरन्स दिला नाही. त्यामुळे विमानतळ कर्मचाऱ्यांनी बाहेरून चहा आणून द्यावा लागला. त्यामुळे त्यांना चहा मिळण्यास उशीर झाला आहे.

Nitin Gadkari
माझ्या ताब्यात 'ईडी' द्या, दाखवतो सगळ्यांना... खासदार उदयनराजे

त्यानंतर घटनास्थळी आलेले कलबुर्गीचे खासदार उमेश जाधव यांनी ही चूक पुन्हा करू नये, असे विमानतळ प्राधिकरणाला सुनावल आहे. मात्र, केंद्रीय मंत्री गडकरी यांना चहा मिळण्यास लागलेल्या उशीराची चांगलीच चर्चा रंगली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.