बापरे! पूर्ण लसीकरण झालेल्या वैद्यकीयच्या 66 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या वैद्यकीयच्या 66 विद्यार्थ्यांना एकाच वेळी कोरोनाचा संसर्ग झाल्याने खळबळ उडाली आहे.
Medical Students
Medical Students Sarkarnama

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा (Covid-19) संसर्ग रोखण्यासाठी कोरोना लशीचे (Covid Vaccine) दोन डोस दिले जात आहे. आता कोरोनापासून बचावासाठी बूस्टर डोस (Booster Dose) देण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. याचवेळी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या वैद्यकीयच्या 66 विद्यार्थ्यांना एकाच वेळी कोरोनाचा संसर्ग झाल्याने खळबळ उडाली आहे.

कर्नाटकातील धारवाड येथील एसडीएस वैद्यकीय महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. यानंतर महाविद्यालयातील 400 पैकी 300 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. याचबरोबर महाविद्यालयातील दोन वसतिगृहे सील करण्याचा आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. याचबरोबर महाविद्यालयातील प्रत्यक्ष होणारे वर्ग रद्द करून व्हर्च्युअल वर्ग घेण्यास सांगण्यात आले आहे.

महाविद्यालयातील 100 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी अद्याप झालेली नाही. त्या विद्यार्थ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना उपचार आणि अन्नपदार्थ दिले जात आहेत. वसतिगृहातून बाहेर पडण्यास कुणालाही परवानगी नाही. चाचणी झालेल्या विद्यार्थ्यांनाही तेथेच विलगीकरणात ठेवले असून, आम्ही चाचण्यांच्या अहवालांची प्रतीक्षा करीत आहोत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Medical Students
खुर्शीद यांच्या पुस्तकावर उच्च न्यायालय म्हणालं, पटत नसेल तर वाचू नका!

सर्वांना बूस्टर डोस लवकरच मिळणार

दरम्यान, लसीकरणविषयक राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाची बैठक पुढील दोन आठवड्यांत होणार आहे. सरकार नागरिकांना बूस्टर डोस देण्याचा निर्णय लवकरच घेणार आहे. या बैठकीत बूस्टर डोस देण्याबाबतचा सर्वंकष आराखडा ठरवला जाणार आहे. याचबरोबर लहान मुलांना कोरोना लस देण्याचाही निर्णयही झाला असून, याची सुरवात जानेवारीपासून होणार आहे.

Medical Students
आंबेगाव-मंचरमध्ये प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांनी उडाली खळबळ

कोविशिल्ड लशीचे उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिटूयटचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी तिसरा डोसही घ्यावा लागणार असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी केला होता. माझ्यासह कंपनीतील कर्मचाऱ्यांनीही तिसरा डोस घेतल्याची कबुली देत त्यांनी इतरांनाही तिसरा डोस घ्यावाच लागेल, असे म्हटले होते. भारतात सध्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन यांसह पाच लशी उपलब्ध आहेत. यापैकी कोणतीही लस घेतली तरी त्याचे दोन डोस घ्यावे लागतात. दुसरा डोस बूस्टर डोस म्हणून गृहित धरला जातो. पण पूनावाला यांनी आता तिसरा डोसही घ्यावा लागणार असल्याचे म्हटले होते. लशीमुळे शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजचे प्रमाण काही दिवसानंतर कमी होत जात असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com