कोरोना लशीच्या वापरावर वयोमर्यादेचे बंधन; फ्रान्सने घेतला मोठा निर्णय

अनेक देशांना सिरमकड़ून कोरोना लशीचा पुरवठा होत आहे. फ्रान्सने या लशीच्या वापरासाठी वयोमर्यादेचे बंधन घातले आहे.
in france astrazeneca vaccine only for peoples above 55 years old
in france astrazeneca vaccine only for peoples above 55 years old

पॅरीस : ऑक्सफोर्ड व अॅस्ट्राझेनेकाच्या कोरोना लशीचा वापर फ्रान्समध्ये लसीकरणासाठी केला जात आहे. या लशीचे उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करीत आहेत. आता लशीसाठी फ्रान्स सरकारने वयोमर्यादेचे बंधन घातले आहे. काही दिवसांपूर्वी फ्रान्सने या लशीवर  तात्पुरती बंदी घातली होती. ती बंदी मागे घेण्यात आली असून, आता वयोमर्यादेचे बंधन घालण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. या परिस्थितीत फ्रान्सने स्ट्राझेनेकाच्या लसीकरणावर निर्बंध आणले आहेत. आता ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनाच स्ट्राझेनेकाची लस दिली जाणार आहे. रक्तात गाठी होत असल्याच्या अहवाल आल्यानंतर फ्रान्ससह युरोपातील अनेक देशांनी या लशीवर तात्पुरती बंदी आणली होती. मात्र, युरोपीय मेडिसीन्स एजन्सीनेस्ट्राझेनेकाची लस सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर फ्रान्सने युरोपमधील अनेक देशांनी या लशीचा पुन्हा वापर सुरू केला आहे. फ्रान्सने मात्र, हा वापर सुरू करताना लसीकरणाच्या नियमात काही बदल केले आहेत. 

जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हिशिल्ड लस सुरक्षित असल्याचे सांगूनही युरोपातील अनेक देशांनी तिचा वापर थांबवला होता. काही देशांमध्ये ही लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचे प्रकार झाल्याचे म्हणणे होते. यामुळे तेथे या लशीचा वापर तात्पुरता थांबवण्यात आला होता. युरोपमध्ये 50 लाख लोकांनी ही लस घेतली होती आणि त्यातील 30 जणांना त्रास झाला होती. याची तपासणी युरोपियन मेडिसीन्स एजन्सीकडून (ईएमए) याची तपासणी सुरू होती. 

अॅस्ट्राझेनेकाची लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे. तिचा रक्ताचा गुठळ्या होण्याशी काहीही संबंध नाही, अशी घोषणा युरोपियन मेडिसीन्स एजन्सीने केली आहे. जागतिक आरोग्य संघटननेनही (डब्लूएचओ) ही लस सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला होता. यानंतर युरोपीय देश या लशीचा कोरोना लसीकरणासाठी पुन्हा वापर करण्यास सुरवात करणार आहेत. यात जर्मनी, फ्रान्स, स्पेन, इटली, नेदरलँड्स, पोर्तुगाल, लिथुआनिया, लॅटिव्हिया, स्लोव्हेनिया आणि बल्गेरिया या देशांचा समावेश आहे. 

आधी हॉलंड, आयर्लंड, डेन्मार्क, नॉर्वे या देशांनी या लशीचा वापर थांबवला होता. त्यानंतर जर्मनी, इटली, फ्रान्स या देशांनीही लशीचा वापर थांबला आहे. त्यापाठोपाठ स्पेन, पोर्तुगाल, स्लोव्हानिया, लॅटिव्हिया या देशांनीही त्याचे अनुकरण केले. त्यामुळे जागितक स्तरावरील लसीकरण मोहिमेला धक्का बसला होता. आता ही लस सुरक्षित असल्याचे समोर आल्याने पुन्हा वेगाने लसीकरण सुरू होणार आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com