Karnataka Election Result: कर्नाटकात काँग्रेसचे संख्याबळ एकने घटले; चारवेळा मतमोजणी अन्‌ बरंच काही घडलं...

K. C. Ramamurthy - Sowmya Reddy: चौथ्या फेरमतमोजणीत भाजपचे के. सी. राममूर्ती हे १६ मतांनी विजयी
K. C. Ramamurthy - Sowmya Reddy
K. C. Ramamurthy - Sowmya ReddySarkarnama

बंगळूर : कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेसच्या उमेदवार सौम्या रेड्डी यांना बंगळूरच्या जयनगर मतदासंघातून पहिल्यांदा विजयी घोषित करण्यात आले हेाते. मात्र, भाजप उमेदवराच्या मागणीवरून या मतदारसंघाची चार वेळा मतमोजणी करण्यात आली आहे, चौथ्या फेरमतमोजणीत भाजपचे उमेदवार के. सी. राममूर्ती हे १६ मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले, त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ घटून १३५ वर आले असून भाजप आमदारांची संख्या ६६ वर गेली आहे. (Fourth re-counting of BJP's K. C. Ramamurthi won by 16 votes)

बंगळूरच्या जयनगर विधानसभा मतदारसंघात अत्यंत रोमांचक निकाल लागला आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार के. सी. राममूर्ती हे १६ मतांच्या फरकाने विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री उशीरा जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या (Congress) आमदारांच्या संख्येत एकाने घट होऊन एकूण विजयी उमेदवारांची संख्या १३५ झाली आहे, तर भाजपची संख्या ६६ वर गेली आहे. मात्र, या निकालाविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचे काँग्रेसच्या पराभूत उमेदवार सौम्या रेड्डी यांनी सांगितले.

K. C. Ramamurthy - Sowmya Reddy
Karnataka Election : मोदी-शहांचा महत्वाकांक्षी ‘गुजरात पॅटर्न’ कर्नाटकात फेल : विद्यमान आमदारांची उमेदवारी कापणे पडले महागात

पहिल्यांदा मतमोजणी झाली, तेव्हा काँग्रेसच्या उमेदवार सौम्या ह्या १६० मतांनी विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, खासदार तेजस्वी सूर्या, आर. अशोक यांनी मतमोजणी केंद्रात घुसून बेकायदेशीर कृत्य केले आहे, त्याची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे तेजस्वी सूर्या यांनी सांगितले. (Political Web Stories)

K. C. Ramamurthy - Sowmya Reddy
Bandal Vs Pawar : खुमखुमी गेली नसेल तर आणखी बरेच विषय आहेत : आमदारकीचा राजीनामा मागणाऱ्या बांदलांना पवारांचा इशारा

बहुचर्चित जयनगर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी पहिल्या फेरीपासूनच चुरशीने सुरू होती. मतमोजणीच्या १६ फेऱ्यांनंतर काँग्रेसच्या सौम्या रेड्डी २९४ मतांनी आघाडीवर असल्याचे निवडणूक निकालाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर भाजपचे उमेदवार सी. के. राममूर्ती यांनी पोस्टल मतांची फेरमतमोजणी करण्याची मागणी केली. एकूण तीन वेळा मतमोजणी करण्यात आली. चौथ्या फेरमोजणीत भाजप उमेदवार १६ मतांच्या फरकाने विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. (Political Short Videos)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com