सीबीआयचा दणका : माजी मंत्र्याची चार वाहने जप्त होणार, लिलावाचीही नोटीस!

IMA Scam : आयएमए घोटाळा प्रकरणात याआधीही अनेक मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. पण यावेळी राज्याच्या माजी मंत्र्यांची वाहने जप्त केली जाणार असल्याने खळबळ माजली आहे.
Roshan Baig
Roshan Baig Sarkarnama

बेळगाव : कर्नाटकातील (Karnataka) गाजलेल्या आयएमए (आय मॉनेटरी ॲडव्हायजरी) घोटाळा (IMA Scam Case) प्रकरणात माजी मंत्री रोशन बेग (Roshan Baig) यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीची वाहने जप्त करण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. राज्याच्या महसूल खात्याचे अप्पर सचिव मल्लिकार्जुन रामचंद्राप्पा यानी हा आदेश बजावला आहे. या आदेशानुसार एकूण चार वाहने जप्त केली जाणार आहेत. जप्ती नोटीस एका कन्नड दैनिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या चारही वाहनांची सविस्तर माहिती महसूल विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी एक वाहन दानीश पब्लीकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड या फर्मच्या नावे आहे पण त्या वाहनाचा वापर रोशन बेग यांच्याकडून केला जातो, असे महसूल विभागाचे म्हणने आहे. बेग यांच्या नावे असलेले एक वाहन तसेच त्यांचा मुलगा रूमान बेग याच्या नावे असलेल्या दोन वाहनांची जप्ती केली जाणार आहे.

Roshan Baig
'रोहित तू बिनधास्त जा, तुझं काम झालं समज', गडकरींच्या शब्दांनी रोहित पाटील भारावले

आयएमए घोटाळा प्रकरणात याआधीही अनेक मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. पण यावेळी राज्याच्या माजी मंत्र्यांची वाहने जप्त केली जाणार असल्याने खळबळ माजली आहे. या वाहनांचे मूल्य निश्‍चित करून त्यांचा लिलाव केला जाणार असल्याचेही महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.

ठेवीदारांकडून कोट्यावधी रूपयांच्या ठेवी जमा करून त्या परत न दिल्यामुळे आयएमए घोटाळा कर्नाटकात उघडकीस आला होता. यासंदर्भात अनेक तक्रारी दाखल झाल्यामुळे या घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे देण्यात आली होती. या प्रकरणात राज्यातील पोलिस खात्यातील प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा ठपकाही ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करून सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानुसार या घोटाळ्यात माजी मंत्री आर. रोशन बेग यांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. सीबीआयने आरोपपत्रात तसे नमूद केले आहे. रोशन बेग यानी आपल्या पदाचा वापर आयएमए कंपनीच्या प्रचारासाठी केल्याचा ठपकाही आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे.

Roshan Baig
आशिष शेलार कोल्हापूरात गेले आणि अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन आले...

आता ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी या कंपनीचे प्रवर्तक, भागीदार, संचालक, व्यवस्थापक, सदस्य व संबंधितांच्या मिळकती जप्त करून, त्यांचा लिलाव केला जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आर. रोशन बेग यांची वाहने जप्त करण्यात येणार आहेत. बेग यानी कर्नाटकात विविध खात्यांचे मंत्रीपद सांभाळले आहे. नगरविकासमंत्री असताना ते बेळगावला आले होते. हॉटेल इफा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यानी काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा इशारा दिला होता. त्यावरून बेळगावसह सीमाभागात मोठा गदारोळ उठला होता. त्यामुळे बेग हे महाराष्ट्रातही चर्चेचा विषय बनले होते. पण आयएमए घोटाळा उघडकीस आल्यापासून ते राजकारणात सक्रीय नाहीत. आता वाहनांची जप्ती व लिलावाची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com