चिंतन शिबीराआधी काँग्रेसचा माजी केंद्रीय मंत्र्याला दणका; पक्षातून केलं निलंबित

काँग्रेसचे तीन दिवसीय चिंतन शिबीर शुक्रवारी (ता. 13) राजस्थानमध्ये सुरू झाले आहे.
K. V. Thomas Latest m,arathi News, Congress Latest Marathi News
K. V. Thomas Latest m,arathi News, Congress Latest Marathi News Sarkarnama

उदयपूर : काँग्रेसचे तीन दिवसीय चिंतन शिबीर शुक्रवारी (ता. 13) राजस्थानमध्ये सुरू झाले आहे. पण त्याआधीच काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री के. व्ही. थॉमस यांना पक्षातून निलंबित केले आहे. सातत्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती केरळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन यांनी दिली. (K V Thomas Latest Marathi News)

सुधाकरण यांनी चिंतन शिबीर होणाऱ्या ठिकाणी गुरूवारी ही घोषणा केल्याचे पक्षातील सुत्रांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून थॉमस यांच्याकडून प्रदेश काँग्रेसवर टीका केली जात आहे. त्यांनी या कारवाईच्या काही तास आधीच कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) व्यासपीठावर हजेरी लावून खळबळ उडवून दिली होती. (Congress Chntan Shivir Latest Marathi News)

K. V. Thomas Latest m,arathi News, Congress Latest Marathi News
महत्वाची बैठक सुरू असताना मोर आला अन् मोदींनी..! शहांनी सांगितला संवेदनशीलतेचा किस्सा

कोचीमध्ये डाव्या पक्षांच्या आघाडीची पोटनिवडणुकीसंदर्भात बैठक होती. या बैठकीला मुख्यमंत्री पिनारयी विजयन हेही उपस्थित होते. थॉमस यांच्या उपस्थितीवरून राजकीय चर्चांना उधाण आले होते. सुधाकरन यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आगामी निवडणुकीथ थॉमस डाव्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

यामुळे थॉमस यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे समजते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संमतीनेच थॉमस यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सुधाकरन यांनी सांगितले. दरम्यान कारवाईच्या आधी माध्यमांशी बोलताना थॉमस यांनी आपण काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केलं होते. एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणूनच मी प्रचारात सहभागी होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं.

K. V. Thomas Latest m,arathi News, Congress Latest Marathi News
आता बास, दोनदा पंतप्रधान झालात! 'पॉवरफुल' नेत्याचा सल्ला अन् मोदींचा गौप्यस्फोट

दरम्यान, शुक्रवारपासून उदयपूरमध्ये काँग्रेसचे तीन दिवसीय चिंतन शिबीर सुरू झाले आहे. या शिबीरात 2024 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे विविध राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर चर्चा केली जाणार आहे. तसेच एक कुटुंब, एक तिकीट या धोरणाचा ठरावही शिबीरात मांडला जाण्याची शक्यता आहे. काही कठोर निर्णय घेतले जाण्याचीही शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in