मोठ्या राजकीय नाट्यानंतर माजी केंद्रीय मंत्र्यांची विधानसभेत एंट्री अन् म्हणाले...

माजी केंद्रीय मंत्र्यांचा अखेर विधानसभेत अधिकृत प्रवेश
Babul Supriyo
Babul SupriyoSarkarnama

कोलकता : माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांना अखेर विधानसभेत अधिकृत प्रवेश मिळाला आहे. राजकीय नाट्यानंतर सुप्रियोंना आमदारकीची शपथ देण्यात आली आहे. त्यांनी मागील वर्षी भाजपला (BJP) धक्का देत तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये डच्चू देण्यात आल्यानं ते नाराज होते. विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर त्यांना 25 दिवसांनी आमदारकीची शपथ मिळाली आहे.

सुप्रियो यांच्या शपथविधीवरून मोठे राजकीय नाट्य रंगले होते. आमदारकीची शपथ घेतल्यानंतर सुप्रियोंनी या वादावर टिप्पणी करणे टाळले. उलट मला आता विधानसभेत एंट्री करण्याचा पासपोर्ट मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. याचबरोबर मी खूप आनंदी असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, विधानसभा उपाध्यक्षांनी शपथ देण्याचा पायंडा याआधी कधीही नव्हता. असे असले तरी मी आनंदी आहे. माझ्या मतदारसंघासाठी मला आता चांगले काम करता येईल.

Babul Supriyo
राज्यपालांनी टाकला तिढा अन् अखेर 25 दिवसांनी आमदाराला घ्यावी लागली शपथ

सुप्रियो यांना आमदारकीच्या शपथ देण्यावरून मोठा राजकीय गदारोळ उडाला होता. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी या प्रकरणात तिढा निर्माण केला होता. राज्यपालांनी ही शपथ देण्याची जबाबदारी विधानसभेच्या उपाध्यक्षांवर सोपवली होती. परंतु, विधानसभा अध्यक्ष उपस्थित असताना उपाध्यक्षांनी शपथ कशी द्यायची, असा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे सुप्रियोंचा शपथविधी रखडला होता. उपाध्यक्षांनी याबाबत राजभवनालाही कळवले होते. अखेर उपाध्यक्षांनी पुढे येऊन सुप्रियोंना शपथ देण्याचा निर्णय घेतला. यामुळे 25 दिवसांनी सुप्रियोंनी आमदारकीची शपथ घेतली. या शपथविधीनंतर उपाध्यक्ष म्हणाले की, राज्यपालांनी जाणीवपूर्वक विधानसभा अध्यक्षांना डावलून मला शपथ देण्यास सांगितले. पण आम्ही एकत्रितपणे उभे राहून याला उत्तर दिलं.

Babul Supriyo
दरेकर अन् चंद्रकांतदादांना तोडगा निघेना! अखेर फडणवीसच हाती घेणार सूत्रे

बालीगंज मतदारसंघात सुप्रियो यांना 51 हजार 199 मते मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सायरा शाह हलीम यांना 30 हजार 971 मते तर तिसऱ्या स्थानी असलेल्या भाजपच्या उमेदवार केया घोष यांना 13 हजार 220 मते मिळाली होती. या मतदारसंघात तृणमूलने 49.69 मते मिळवली तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 30.06 टक्के मते मिळाली. केंद्रीय मंत्रिपद, खासदारकी आणि आता आमदारकी असा उलटा प्रवास सुप्रियो यांच्या निमित्ताने बंगालच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com