Sarpanch : माजी सरपंचाने भाच्याच्या लग्नात पाडला पैशांचा पाऊस; घराच्या गच्चीवरुन लाखो रुपये उधळले

Former sarpanch in Gujarat : लग्नामध्ये पैशाची उधळण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Sarpanch News
Sarpanch News Sarkarnama

Former sarpanch in Gujarat News : भारतात लग्न थाटामाटात करण्याची प्रथा आहे. त्यामुळे लग्नामध्ये मोठा खर्चही केला जातो. आता असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लग्नामध्ये पैशाची उधळण केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लग्न सोहळ्यादरम्यान काही व्यक्ती घराच्या गच्चीवरुन लाखो रुपयांच्या नोटा उधळताना दिसत आहेत. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

हा लग्न सोहळा गुजरातमधील एका माजी सरपंचाच्या भाच्याच्या लग्नातला असल्याचे बोलले जात आहे. या लग्न सोहळ्यादरम्यान लाखो रुपये हवेत उडवल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ एका व्यक्तीने ट्विटरवर शेअर केला असून यामुळे खळबळ उडाली आहे.

Sarpanch News
Harshvardhan Jadhav News : शिंदे-ठाकरेंशी काही देणेघेणे नाही, माझा आत्मा बाळासाहेबांसाठी तुटतोय..

एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार व्हायरल व्हिडिओ गुजरातच्या केकरी तालुक्यातील असल्याच सांगण्याच येत आहे. तर या सोहळ्यादरम्यान घराच्या गच्चीवरुन लाखो रुपयांच्या नोटा खाली उधळण्यात आल्या आहेत. लग्नाला आलेल्या पाहुण्यांची मात्र, या नोटा गोळा करण्यासाठी तोबा गर्दी केल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार गुजरातमध्ये एका लग्नसोहळ्यामध्ये चक्क नोटांचा पाऊस पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतचा व्हिडिओ एका व्यक्तीने ट्वीटरवर शेअर केला आहे. या पैशांची उधळण केल्याचा व्हिडिओ पाहून नेटकरीही संतापले आहेत.

Sarpanch News
Effect Shivsena; शिवजयंती मिरवणुकीतून सहा मंडळांची माघार!

दरम्यान, लग्नसोहळा मोठ्या थाटा-माटात व्हावा असं सर्वांनाच वाटतं. पण पाहुण्यांना खूश करण्यासाठी पैशाचा पाऊस पाडल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. घराच्या गच्चीवरून नोटा फेकल्यानंतर पैसे गोळा करण्यासाठी खाली लग्नसोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांनी मोठी गर्दी केल्याचे व्हिडिओत पाहायला दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com