पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान गोळीबारात जखमी; आरोपीला अटक

पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या रॅलीत गोळीबार झाला.
Imran Khan News
Imran Khan Newssarkarnama

Imran Khan News : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या रॅलीत गोळीबारा झाला. त्यामध्ये इम्रान खान जखमी झाले आहेत. इम्रान खान पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यापासून सरकार विरोधात चांगले आक्रमक झाले आहेत. त्यांनी पाकिस्तान सरकारच्या विरोधात आघाडी उघडली आहे.

Imran Khan News
इम्रान खान यांची मुलाखत घ्यायला गेलेल्या महिला पत्रकाराचा रॅलीत मृत्यू ; घटना घडलीच कशी?

गोळीबारात पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. गुजरांवाला येथे झालेल्या हल्ल्यात इम्रान खान जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना नेत असताना त्याच्या उजव्या पायाला पट्टी बांधलेली दिसली. त्यामुळे त्यांच्या पायाला गोळी लागल्याचे सांगितले जात आहे.

रॅलीत गोळीबार करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सरकारच्या विरोधात आझादी मोर्चामध्ये इम्रान खान ट्रकवर उभे होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ही घटना 2007 मध्ये माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्यावर झालेल्या हल्ल्याची आठवण करून देणारी आहे, जेव्हा त्यांची एका रॅलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

Imran Khan News
Shivsena : 'मशालीचा' वाद अखेर शमला : समता पार्टीची याचिका फेटाळली!

इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबाराचा आवाज येताच अल्लाहवाला चौकात त्यांच्या स्वागतासाठी उभारलेल्या छावणीत एकच खळबळ उडाली. लष्कराचा विश्वास गमावल्यामुळे एप्रिलमध्ये इम्रान यांना पंतप्रधान पदावरुन पायउतार व्हावे लागले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in