डॉ.मनमोहनसिंगांची प्रकृती बिघडली; तातडीनं एम्समध्ये हलवलं

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना आज भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले.
डॉ.मनमोहनसिंगांची प्रकृती बिघडली; तातडीनं एम्समध्ये हलवलं
Dr.Manmohan SinghFile Photo

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग (Manmohan Singh( यांना आज भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) दाखल करण्यात आले. डॉ. सिंग यांना ताप आला असून अशक्तपणा जाणवत आहे. त्यामुळे त्यांना तातडीने एम्समध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आज डॉ.सिंग यांना ताप आणि अशक्तपणा जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने एम्समध्ये हलवण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना याच वर्षी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत ते कोरोनाबाधित झाले होते. त्यांना 19 एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते कोरोनाशी यशस्वी झुंज देऊन 29 एप्रिलला रुग्णालयातून बाहेर पडले होते.

Dr.Manmohan Singh
सिद्धरामय्यांचे कुमारस्वामींना आव्हान...तर मी राजकारणातून संन्यास घेईन

मागील वर्षी मे महिन्यात डॉ. सिंग यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर कार्डिओ थोरॅसिक विभागात उपचार सुरू आहेत. डॉ. सिंग यांच्यावर 2009 मध्ये ‘एम्स’मध्येच बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉ.मनमोहनसिंग हे 88 वर्षांचे आहेत. ते राज्यसभा सदस्य आहेत. ते राजस्थानमधून राज्यसभेवर गेले आहेत.

Related Stories

No stories found.