NSE Scam:चित्रा रामकृष्ण यांना अटक; CBIची कारवाई

शनिवारी रामकृष्ण यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज देखील केला होता. मात्र सीबीआय न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
Chitra Ramkrishna Latest News Updates | NSE Scam Latest News |Chitra Ramakrishna Arrested News
Chitra Ramkrishna Latest News Updates | NSE Scam Latest News |Chitra Ramakrishna Arrested Newssarkarnama

नवी दिल्ली : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई)च्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांना सीबीआयने (CBI) रविवारी रात्री उशिरा अटक (Arrest)करण्यात आली.

‘एनएसई’चा व्यवहार एका साधूच्या आदेशानुसार चालतो असा खळबळजनक दावा चित्रा रामकृष्ण यांनी सेबीच्या चौकशीदरम्यान केला होता. त्यांच्या या दाव्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. (Chitra Ramkrishna Latest News Updates)

चित्रा रामकृष्ण यांची गेल्या तीन दिवसांपासून चौकशी सुरू होती. त्यांच्या घराची झडती देखील घेण्यात आली, मात्र त्यांच्याकडून चौकशीला प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना दिल्लीमधून अटक करण्यात आली आहे.

शनिवारी रामकृष्ण यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज देखील केला होता. मात्र सीबीआय न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना अटक केली. त्यांना सीबीआयच्या कोठडीत ठेवण्यात येणार आहे.

Chitra Ramkrishna Latest News Updates | NSE Scam Latest News |Chitra Ramakrishna Arrested News
Operation Ganga:भारतानं करुन दाखवलं ; विद्यार्थ्यांमुळेच देशाची पत वाढली!

‘एनएसई’च्या व्यवहारांमध्ये अनियमितता आढळल्याने चित्रा रामकृष्ण यांची सेबीकडून देखील चौकशी सुरू आहे. व्यवहार अनियमितते प्रकरणात चित्रा रामकृष्ण यांची गेल्या तीन दिवसांपासून चौकशी सुरू आहे, त्यांच्या घराची झडती देखील घेण्यात आल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (NSE Scam Latest News Updates)

एनएसई 'को-लोकेशन' प्रकरणात सीबीआयने अलीकडेच रामकृष्ण यांची चौकशी केली होती. आयकर विभागाने यापूर्वी मुंबई आणि चेन्नई येथील चित्रा रामकृष्ण यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले होते.

Chitra Ramkrishna Latest News Updates | NSE Scam Latest News |Chitra Ramakrishna Arrested News
युवकांनो, तुमच्या शक्तीवर भरवसा ; जगाला सामर्थ्य दाखवा ; मोदींचे आवाहन

'सेबी' (SEBI) ने या प्रकरणी काढलेल्या 190 पानी आदेशामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. एनएसईमध्ये कार्यरत असताना रामकृष्ण या कथित योगीच्या सल्याने निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्या मागील वीस वर्षांपासून योगीच्या संपर्कात होत्या. त्या योगीला शिरोमणी असं म्हणत होत्या पण त्याला कधीही पाहिले नसल्याचा दावा त्यांनी केला होता. प्रत्यक्षात सेबीच्या तपासात त्यांनी अनेकवेळा या योगीची भेट घेतल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर दोघे एकत्रितपणे सेशल्समध्ये सहलीला गेले होते. (former nse ceo chitra ramakrishna arrested)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com