मोदी सरकार कठोर : पद गेलेल्या मंत्र्यांना बंगले सोडावे लागणार; अन्यथा कारवाई

Central Government|Prakash Javadekar : प्रकाश जावडेकर यांनी काहीही खळखळ न करता नवीन बंगला स्वीकारण्याची तयारी दाखविल्याचे सीपीडब्य्लूडी अधिकाऱ्यांनी मान्य केले, असे सांगितले.
Ramvilas Paswan bungalow
Ramvilas Paswan bungalowSarkarnama

नवी दिल्ली : दिवंगत मंत्री रामविलास पासवान (Ramvilas Paswan) यांचा १२ जनपथ हा मोक्याच्या जागेवरील बंगला (bungalow) खाली करण्याची कामगिरी फत्ते होताच सरकारने (Central Government) आता मंत्रिमंडळात नसलेल्या ज्येष्ठांनी अडवलेल्या मोठ्या, प्रशस्त बंगल्यांकडे लक्ष वळविले आहे. मोदी मंत्रिमंडळातून अलीकडे गच्छंती झालेल्या मंत्र्यांनाही आता सध्याचे बंगले सोडावे लागणार आहेत. माजी शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल (Ramesh Pokhriyal) निशंक यांचा सफदरजंग रस्त्यावरील टाईप-८ श्रेणीतील मोठा बंगला त्यांना लवकरच सोडावा लागणार आहे.

Ramvilas Paswan bungalow
युक्रेनचा रशियावर 'सर्जिकल स्ट्राईक'; पहिल्यांदाच मोठं धाडस करत घडवली अद्दल

निवडणुकीत पराभव झाला किंवा राज्यसभेची मुदत संपली तरी सरकारी बंगला खाली करून देण्यास अनेक राजकीय नेते तयार होत नाहीत. मंत्रिपदावरून पायउतार झाल्यावर महिनाभरात सरकारी बंगला खाली करावा हा नियम केवळ कागदावरच राहिलेला दिसतो. ल्यूटियन्स दिल्लीत मुळात सरकारी बंगल्यांची संख्या मर्यादित असल्याने मग बंगल्याला चिकटून राहणाऱ्या अनेकांवर केमोथेरपीसदृश्य कारवाईच करावी लागते. मात्र सीपीडब्ब्यूडीकडून अनेकदा जास्तच सक्ती केली जात असल्याचीही तक्रार आहे. सध्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत होताच सीपीडब्ल्यूडीला काही महिनेही धीर धरवला नव्हता. त्यांच्यावरही अशीच कारवाई झाली होती. एका पावसाळी संध्याकाळी, आठवले दिल्लीत नसतानाही लोधी इस्टेट भागातील आठवलेंच्या बंगल्यातील सामान, राज्यघटनेच्या प्रती, डॅा. आंबोडकरांची छायाचित्रे वगैरे सामान संबंधित अधिकाऱयांनी फूटपाथवर आणून ठेवले होते. मोदी सरकारने तर याबाबत आणखी कडक धोरण ठेवले आहे. ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी न्यायालयात जाऊनही त्यांना तुघलक रस्त्यावरील बंगला त्वरित खाली करून देणे भाग आहे. दिवंगत मंत्री रामविलास पासवान यांनी अनेक दशके स्वतःकडे राखलेले १२ जनपथ हे निवासस्थान नुकतेच रिकामे करण्यात आले. येथे पासवानांचा पुतळा उभारण्याची चलाखी खासदार चिराग पासवान यांनी दाखविली त्यालाही सरकारने दाद दिली नाही. आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना तो बंगला देण्यात आला आहे.

Ramvilas Paswan bungalow
मोदी म्हणाले; परीक्षा ‘ऑनलाइन’ की ‘ऑफलाइन’ ही समस्या नव्हे : मनाची एकाग्रता महत्वाची

यानंतर सर्वश्री निशंक, प्रकाश जावडेकर , रविशंकर प्रसाद आदींवरही सध्याचे बंगले सोडावे लागण्याची कारवाई होणार आहे. निशंक यांचा बंगला ज्योतिरादित्य शिंदे यांना देण्यात आला आहे. मात्र निशंक बंगला सोडत नसल्याने शिंदे दिल्लीतील आनंद लोक भागातील आपल्या खासगी निवासस्थानी रहात आहेत. २७ सफदरजंग रस्ता हा ज्योतिरादित्य यांच्यासाठीही भावनिक विषय आहे. त्यांचे वडील माधवराव शिंदे हे जवळपास पूर्ण राजकीय कारकीर्द याच बंगल्यात राहिले. स्वतः ज्योतिरादित्यही २०१९ पर्यंत येथे रहात होते. मात्र निवडणुकीत पराभव होताच त्यांनी त्वरित बंगला सोडून दिला होता व निशंक तेथे रहायला गेले होते. हा बंगला खाली करण्याबाबत नोटीसांवर नोटीसांनाही दाद न देणारे निशंक यांच्यावर उत्तराखंडची रणधुमाळी संपताच आता - द्याल तर प्रेमाने नाही तर सक्तीने, या धर्थीची कारवाई करण्याची सज्जता केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (सीपीडब्ब्यूडी) अधिकाऱयांनी केली आहे. लवकरच त्यांच्या सध्याच्या सफदरजंग रस्त्यावरील २७ क्रमांकाच्या बंगल्यात अधिकाऱयांचे पथक धडकणार आहे. आपल्याला आणखी काही दिवस हा बंगल्यात राहू द्यावे ही त्यांची मागणी अमान्य केल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. तुघलक लेनमधील नव्या बंगल्यात लवकरात लवकर मुक्काम हलवा, अशा धर्तीचा स्पष्ट संदेश पोखरियाल यांच्यापर्यंत पोचविण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Ramvilas Paswan bungalow
सर्वोच्च न्यायालयाकडून ठाकरे सरकारला सात दिवसांत दुसरा धक्का

प्रसाद यांचा मुक्काम गेली अनेक वर्षे मदर तेरेसा क्रिसेंट भागातील मोठ्या बंगल्यात आहे. प्रसाद यांनाही नोटीस पाठविण्यात आल्याचे सांगितले जाते. जावडेकर यांना ६-कुशक रस्ता येथील सध्याचा प्रशस्त बंगला सोडून तुघलक लेनमधील नवे निवासस्थान देण्यात आले आहे. ६-कुशक रस्त्यावर आता मंत्री नारायण राणे रहायला येणार आहेत. हा अतिप्रशस्त बंगला पूर्वी तत्कालीन विदेशमंत्री व अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्याकडे वर्षानुवर्षे होता. २०१६ पर्यंत वाट पाहून नंतर त्यांच्याकडून तो खाली करवून घेण्यात आला. त्यानंतर सिन्हा यांच्या मोदीविरोधाला धार आली, असे मानले जाते. जावडेकर यांनी काहीही खळखळ न करता नवीन बंगला स्वीकारण्याची तयारी दाखविल्याचे सीपीडब्य्लूडी अधिकाऱयांनी मान्य केले. मात्र त्यांना जो नवीन बंगला देण्यात आला तेथील माजी भाजप खासदारांनीच बंगला सोडण्यास विलंब केल्याची माहिती मिळते. आता महिनाभरात जावडेकर नवीन निवासस्थानी रहाण्यास जाणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in