तेजस्वी यादव उट्टे काढणार; नितीश कुमारांना देणार धक्का - Former JDU MLA Manjit Singh will join RJD in presence of Tejaswi Yadav | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

तेजस्वी यादव उट्टे काढणार; नितीश कुमारांना देणार धक्का

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 जुलै 2021

बिहारच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत.

पाटणा : लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पावसान (Chirag Paswan) यांच्या पक्षातील अनेक नेत्यांना फोडत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मोठा धक्का दिला. पासवान यांच्या काकांनीही बंड केल्यानं नीतिश कुमारांच्या (Nitish Kumar) संयुक्त जनता दलाला अधिकच बळ मिळालं. पण आता त्यांनाच धक्का देण्याची तयारी जनता राष्ट्रीय जनता दलानं सुरू केल्याची चिन्हं आहेत. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या संपर्कात काही नेते असल्याचे समोर आले आहे. (Former JDU MLA Manjit Singh will join RJD in presence of Tejaswi Yadav)

बिहारच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. जदयू व राजद एकत्रित सत्तेत असताना तेजस्वी यादव यांच्यावर नितीश कुमार यांनीच जोरदार टीका करत युती तोडली होती. तेव्हापासून यादव व कुमार यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्यामुळं दोन्ही पक्ष एकमेकांना शह देण्याची एकही संधी सोडत नाहीत. 

त्यातच जदयूचे माजी आमदार मंजीत सिंह हे पुढील एक-दोन दिवसांत राजदमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. ते मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. विधानसभा निवडणुकीत त्यांचा मतदारसंघ भाजपला गेल्याने तिकीट मिळालं नाही. तेव्हापासून ते नाराज आहे. तसेच या मतदारसंघातून भाजपचा उमेदवारही निवडून आला नाही.

हेही वाचा : ईडीचा न्यायालयात खळबळजनक दावा; आणखी मंत्री अडचणीत येणार

मंजीत सिंह पक्षांत करण्याची शक्यता असल्याननं नितीश कुमार यांनी आता त्यांची मनधरणी सुरू केली आहे. लेसी सिंह आणि जय कुमार सिंह यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काही बैठकांनंतर जदयूकडून मंजीत सिंह पक्षात करण्याचा दावा करण्यात आला. राजदमध्ये जाण्यापासून रोखण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांची तक्रार ऐकून घेण्यात आली असून नाराजी दूर केली जाईल. तसेच मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलल्याचे समजते.

लालू प्रसाद लवकरच परतणार

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव हे जवळपास चार वर्षांनंतर बिहारमध्ये एंट्री करणार आहेत. पाच जुलै रोजी राजदचा स्थापना दिन असून ते राज्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. लालू प्रसाद परत येणार असल्याने एनडीएमध्येही हालचाली सुरू झाल्या आहेत. लालू प्रसाद यांच्या आगमनावेळी जदयूमधील काही नेत्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न राजदकडून सुरू असल्याचे समजते.

 भाजपचा पलटवार

लालू प्रसाद बिहारमध्ये परतले तरी राज्यातील राजकारणावर काहीच परिणाम होणार नाही, असा दावा भाजपचे नेते सुशील मोदी यांनी केला आहे. तसेच इतर नेत्यांनीही एनडीएला काहीही फक पडणार नसल्याचे सांगितले. पण राजदकडून लालू प्रसाद यांची घरवापसी जोमात करण्याचे संकेत मिळत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख