मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या भाजप नेत्याचा सरपंच पत्नीसह काँग्रेसमध्ये प्रवेश

निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Michael Lobo
Michael LoboSarkarnama

पणजी : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर गोवा भाजपला (BJP) मोठा झटका बसला आहे. मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर बड्या नेत्यानं सरपंच पत्नीसह पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या मतदारसंघातील अनेक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाला रामराम केला आहे. त्यांनी काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केल्याने भाजपला धक्का बसला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यातील (Goa) राजकारण चांगलंच तापलं आहे. या धामधुमीत विज्ञान, तंत्रज्ञान आणि घनकचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) यांनी दोन दिवसांपूर्वी मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांनी त्यांनी मंगळवारी रात्री काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह पत्नी डेलिलाह लोबो (Delilah Lobo) यांनीही काँग्रेसचा हात हातात धरला आहे.

Michael Lobo
वाद पेटला! आव्हाड भडकले अन् थेट आमदार महेश शिंदेंची लाज काढली

मायकल लोबो हे कळंगुट मतदारसंघाचे आमदार होते. तर त्यांच्या पत्नी सरपंच असून भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष होत्या. दोघांना काँग्रेसकडून तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मायकल लोबो यांचा उत्तर गोव्यात मोठा दबदबा असल्याचे मानले जाते. त्यामुळे भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे.

राजीनामा दिल्यानंतर लोबो म्हणाले होते की, मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कलंकुट मतदारसंघातील मतदार माझ्या निर्णयाचा आदर करतील, अशी आशा आहे. मी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. इतर राजकीय पक्षांसोबत माझी चर्चा सुरू आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. मी पक्षांतर्गत कारणांमुळे नाराज होतो. तसेच पक्षाचे कार्यकर्तेही निराश झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in