
Special Session of Parliament : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहून संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा जाहीर करण्याची मागणी केली आहे. कोणतीही चर्चा न करता विशेष अधिवेशन का जाहीर करण्यात आले, असा सवाल सोनिया गांधी यांनी केला आहे. मंगळवारी (५ सप्टेंबर) त्यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची बैठक झाली त्यानंतर 'इंडिया' आघाडीच्या पक्षांच्या खासदारांसोबत बैठक झाली. अधिवेशनात विरोधक कोणते मुद्दे उपस्थित करणार आहेत, याबाबत बैठकीत चर्चा झाली.
संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा जाहीर न होण्याची ही पहिलीच वेळ आहे, ही दुर्दैवी बाब आहे, असे सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पत्रात म्हटले आहे. सोनिया गांधी यांनी पत्रात विशेष अधिवेशनात पक्षाला कोणते मुद्दे मांडायचे आहेत याचाही उल्लेख केला आहे. या मुद्द्यांवर चर्चा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. केवळ सरकारच्या अजेंड्यावर चर्चा होऊ नये. संसदेचे विशेष अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान बोलावण्यात आले आहे.
विशेष अधिवेशनात काँग्रेस (Congress) पुढील मुद्दे मांडणार आहे. यामध्ये महागाई, बेरोजगारी, एमएसएमई उद्योगाच्या समस्या. शेतकऱ्यांना एमएसपीची मागणी, शेतकरी आंदोलनादरम्यान एमएसपीची कायदेशीर हमी देण्याचे आश्वासन दिले होते की नाही यावर चर्चा.
अदानी समूहाबाबतचे कथित खुलासे आणि समूहाचे मोदी सरकारशी असलेले कथित संबंध आणि जेपीसी स्थापन करण्याची मागणी यावर चर्चा. जात जनगणना आवश्यक आहे. तशीच जात जनगणनेचीही मागणी आहे. रणनीतीचा एक भाग म्हणून, बिगर भाजपशासित राज्यांना त्रास दिला जात आहे. केंद्र-राज्य संबंधांवर चर्चा व्हायला हवी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अनेक राज्यांना अतिवृष्टी आणि दुष्काळाचा फटका बसला आहे, परंतु केंद्र सरकारने आपत्ती जाहीर केलेली नाही. यावर चर्चा व्हायला हवी. चिनी घुसखोरीवर तीन वर्षे चर्चा झाली नाही. यावर सामूहिक ठराव व्हायला हवा. हरियाणासह विविध राज्यांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण आहे. यावर चर्चा व्हायला हवी. चार महिन्यांनंतरही मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. इंफाळमध्ये पुढील पाच दिवस कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यावर चर्चा आवश्यक असल्याचे सोनिया गांधी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.