ममतांचा दे धक्का! राहुल गांधींचे निकटवर्ती माजी खासदार करणार तृणमूलमध्ये प्रवेश

काँग्रेसचे माजी खासदार अशोक तंवर हे तृणमूलमध्ये प्रवेश करणार असून ते राहुल गांधींचे निकटवर्ती मानले जात होते.
Ashok Tanwar
Ashok TanwarSarkarnama

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांत काँग्रेसमधील (Congress) अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेसचे माजी खासदार किर्ती आझाद (Kirti Azad) आज तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश करणार आहेत. यानंतर काही वेळातच काँग्रेसचे माजी खासदार अशोक तंवर (Ashok Tanwar) हेसुद्धा तृणमूलमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी आली आहे. तंवर हे काँग्रेस नेते राहुल गांधींचे निकटवर्ती मानले जात होते.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतरही तृणमूल आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढाई सुरू आहे. तृणमूलने राष्ट्रीय पातळीवर आक्रमकपणे विस्तार करण्याचे पाऊल उचलले आहे. काँग्रेसच्या अनेक राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना तृणमूल फोडत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आजपासून दिल्ली दौऱ्यावर असून, काँग्रेसला मोठा धक्का देण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. तृणमूलने पश्चिम बंगालसह गोवा व त्रिपुरामध्ये काँग्रेसला धक्के दिले आहेत. ममतांकडूनही उघडपणे काँग्रेसवर शरसंधान साधले जात आहे. तर दुसरीकडे त्यांच्याकडून भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहनही केले जात आहे.

अशोक तंवर हे हरियानातील माजी खासदार आहेत. त्यांनी 2019 मध्ये काँग्रेसला रामराम केला होता. नंतर त्यांनी अपना भारत मोर्चा हा पक्ष स्थापन केला होता. तंवर हे आधी राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जात. परंतु, हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हूडा आणि इतर नेत्यांसोबत मतभेद झाल्याने त्यांनी काँग्रेस सोडली होती. आता ते तृणमूलसोबत जात आहेत. तंवर हे युवक काँग्रेसचे अध्यक्षही होते. हरियानातील ते वजनदार नेते असल्याने तृणमूलला तेथे पक्ष विस्तार करण्यास वाव मिळणार आहे.

Ashok Tanwar
भाजप सोडल्यानंतर दोनच महिन्यांत बड्या नेत्याची आमदारकी धोक्यात

दरम्यान, माजी खासदार किर्ती आझाद हेसुद्धा काँग्रेस सोडून तृणमूलमध्ये प्रवेश करणार आहेत. आझाद हे आधी भाजपमध्ये होते. त्यांना 23 डिसेंबर 2015 रोजी पक्षातून निलंबित केले होते. त्यांनी तत्कालीन अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर उघडपणे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली होती. आझाद यांनी 2018 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करत राजकारणातील दुसरी इनिंग सुरू केली होती. ते 2018 मध्ये भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. पण पक्षात त्यांना फारसे महत्व राहिले नसल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

Ashok Tanwar
उच्च न्यायालयानं बाजूनं निकाल दिला अन् नवाब मलिकांनी केला निर्धार...

आझाद हे 1983 च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय टीमचे सदस्य होते. क्रिकेटमधून राजकारणात येत त्यांनी तीनवेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. 2014 मध्येही ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. बिहारमधील दरभंगा मतदारसंघात त्यांचा दबदबा होता. पण जेटली यांच्यावरील टीका त्यांना भोवली. ममता बॅनर्जी आज दिल्लीत दाखल होत असून सायंकाळी 5 वाजता त्यांच्या उपस्थितीतच आझाद आणि तंवर यांचा तृणमूलमध्ये प्रवेश होणार असल्याचे समजते. मागील काही दिवसांपासून तृणमूलमध्ये दाखल होणाऱ्या नेत्यांची यादी वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com