मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार बसले बूटपॉलिशला अन् म्हणाले...

मुख्यमंत्र्यांनी सरकावरील पकड घट्ट करीत जवळच्या अधिकाऱ्यांना राजकारणात आणण्याचे धोरण सुरू केले आहे.
Congress
Congress Sarkaranama

नवी दिल्ली : पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) धुरा चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी हाती घेतली आहे. त्यांनी सरकावरील पकड घट्ट करीत जवळच्या अधिकाऱ्यांना राजकारणात आणण्याचे धोरण सुरू केले आहे. चन्नी यांनी चार अधिकाऱ्यांची नावे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुढे केल्यामुळे काँग्रेसचे (Congress) माजी आमदार नाराज झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात गांधीगिरी करीत ते थेट बस स्टँडवरच बूटपॉलिश करायला बसले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत.

मोहनलाल बंगा (Mohan Lal Banga) असे या माजी आमदाराचे नाव आहे. ते बंगा या राखीव मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले आहेत. मुख्यमंत्री चन्नी यांनी नुकतीच या मतदारसंघाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवार म्हणून प्रधान सचिव हुसेनलाल यांना पुढे केले. यामुळे मोहनलाल यांना त्यांचे तिकिट कापले जाणार हे कळाले. यानंतर संतापलेल्या मोहनलाल यांनी थेट रस्त्यावर बूटपॉलिश करणाऱ्याच्या शेजारी बैठक मारली. त्यांनी दिवसभर त्याच्या शेजारी बसून बूटपॉलिश करून पैसे मिळवले.

या वेळी बोलताना बंगा म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जवळचे अधिकारी आणि सनदी अधिकाऱ्यांना तिकिट देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हे चार अधिकाऱ्यांनी तिकिट देणार आहेत. ते अधिकाऱ्यांना तिकिट देणार असतील अनेक राजकारण्यांना काय कामच राहणार नाही. याचा निषेध करण्यासाठी मी बूटपॉलिश करायला बसलो होतो. बूटपॉलिश करणाऱ्याला मी मदत करून पैसै मिळवून दिले. आमचा समाज पिढ्यानपिढ्या चामड्याचा उद्योग करीत आहे. आता तोच पुढे मी कायम ठेवेन.

चन्नी यांच्या रुपाने काँग्रेसला पंजाबमध्ये पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला आहे. मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचा यांच्यासोबत काँग्रेस हाय कमांडने सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ.पी.सैनी यांनी हे दोन उपमुख्यमंत्री दिले आहेत. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. जातीय समीकरणे पाहून राहुल गांधींनी दोन उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज नेत्यांना खूष करण्याचा हा प्रयत्न होता.

Congress
इलेक्ट्रिक गाडी खरेदी करताय? नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू होता. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते.

Congress
एनसीबीच्या कार्यालयासमोरच आर्यनचा मित्र अरबाझ वडिलांवर संतापला अन्...

पंजाब काँग्रेसमध्ये प्रदीर्घ काळ वाद सुरू होता. अमरिंदरससिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात संघर्ष सुरू होता. यामुळे पक्ष दोन गटांत विभागला गेला. सिद्धू हे प्रदेशाध्यक्ष झाल्याने अमरिंदरसिंग यांना शह बसण्यास सुरवात झाली. यातून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात झाली होती. अखेर अमरिंदरसिंग यांनी पक्ष सोडून नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com