Parkash Singh Badal : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे निधन

Panjab State : सर्वात तरुण संरपंच ते सर्वात वयोवृद्ध विधानसभेचे उमेदवार
Prakash Singh Badal
Prakash Singh BadalSarkarnama

Parkash Singh Badal Dies at 95 : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे मंगळवारी (ता. २५) रात्री साडेआठच्या सुमारास निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. प्रकृती खालावल्याने त्यांना शुक्रवारी सकाळी मोहालीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकाश सिंह बादल पाच वेळा पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते.

Prakash Singh Badal
Gulabrao Patil News : जळगाव बाजार समितीत वर्चस्वासाठी दोन्ही गुलाबरावांची कसोटी

पंजाबच्या 2022 मधील विधानसभेच्या निवडणुकीत बादल (Parkash Singh Badal) यांचा पराभव झाला होता. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील हा पहिलाच पराभव होता. वृद्धत्वामुळे त्यांना निवडणूक लढवायची नव्हती, पण मुलगा सुखबीर बादल यांच्या सांगण्यावरून आणि पंजाबमध्ये अकाली दलाची दयनीय अवस्था पाहून प्रकाशसिंग बादल निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.

दरम्यान, बादल यांना जून 2022 मध्येही छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही वेळाने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांची तब्येत पुन्हा खालावल्याने त्यांना चंदीगडमधील रुग्णालयात दाखल केले होते.

Prakash Singh Badal
Pune News: मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार?; आरक्षणाच्या लढ्यासाठी पिंपरी-चिंचवडला होणार मराठा आरक्षण एल्गार परिषद

प्रकाशसिंग बादल यांनी 1947 मध्ये राजकारणाला सुरुवात केली. त्यांनी सरपंचाची निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर ते सर्वात तरुण सरपंच झाले. 1957 मध्ये त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली. 1969 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. 1969-70 पर्यंत ते पंचायत राज, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय इत्यादी मंत्रालयांचे मंत्री होते. याशिवाय ते 1970-71, 1977-80, 1997-2002 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री झाले. 1972, 1980 आणि 2002 मध्ये ते विरोधी पक्षनेतेही झाले. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना ते खासदार म्हणून निवडून आले होते. 2022 ची पंजाब विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर ते सर्वात वयस्कर उमेदवार देखील ठरले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com