Karnataka Election: निवडणुकीच्या निकालाआधीच कुमारस्वामींचं मोठं विधान; म्हणाले, ही अट मान्य करणाऱ्या पक्षासोबत...

Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक निवडणुकीचा उद्या लागणार निकाल..
Karnataka Election
Karnataka ElectionSarkarnama

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (दि.13मे ) समोर येणार आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? कोणत्या पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. याबरोबरच कोणत्या पक्षाचे सरकार येऊ शकतं? याबाबतची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पण कर्नाटक निवडणुकीच्या निकाला आधीच एक दिवस माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे प्रमुख एचडी कुमारस्वामी यांनी मोठं विधान केलं आहे. "माझ्या अटी मान्य करणाऱ्या पक्षासोबत मी युती करण्यास तयार आहे. आमच्या मदतीशिवाय कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकणार नाही", असं सूचक वक्तव्य कुमारस्वामींनी केलं.

Karnataka Election
Karnataka Election : कर्नाटकात पराभव झाल्यास दक्षिणेतून भाजपचा परतीचा प्रवास; दक्षिणतेल्या राजकारणाचं महत्त्व काय?

या पार्श्नभूमीवर बोलताना कुमारस्वामी म्हणाले, "मला विश्वास आहे जेडीएस 50 जागा जिंकेल. त्यामुळे जेडीएस भाजप आणि काँग्रेससोबत सत्तेत सहाभागी होण्यास तयार आहे. मात्र, जेडीएसच्या अटी काँग्रेस आणि भाजपने जर मान्य केल्या तर त्या पक्षाला जेडीएस पाठिंबा देईल", असं ते म्हणाले.

Karnataka Election
Karnataka Election Exit Poll: कर्नाटकात कोण ठरणार किंग; काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे?

दरम्यान, कुमारस्वामी यांचे हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे. त्यामुळे आता कर्नाटकमध्ये काय-काय राजकीय घडामोडी घडतात? हे निवडणुकीच्या निकालानंतरच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By : Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com