...म्हणून केली होती शहांसाठी वकिली; माजी सरन्यायाधीश लळीत यांनी सांगितले कारण

Uday Lalit News : माजी सरन्यायाधीशांना शहांची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात का उभे राहावे लागले होते?
Uday Lalit
Uday LalitSarkarnama

नवी दिल्ली : सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासाठी मी न्यायालयात उभा राहिलो होतो. हे जरी खरं असलं तरी त्यावेळी मी मुख्य वकील नव्हतो, असं स्पष्टीकरण माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी दिलंय. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

सोहराबुद्दीन शेख प्रकरणामध्ये अमित शहांच्याबाजूने तुम्ही कोर्टात उभे राहीले होते का? या प्रश्नाच उत्तर देताना लळीत म्हणाले, ''सोहराबुद्दीन शेख चकमकी प्रकरणी गृहमंत्री अमित शहांच्यावतीने मला न्यायालयात बाजू मांडण्यासाठी उभे राहावे लागले होते. मात्र, मी त्या प्रकरणात मुख्य वकील नव्हतो. या प्रकणात त्यांची बाजू मांडण्यासाठी मुख्य वकील हे राम जेठमलानी (Ram Jethmalani) होते, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

Uday Lalit
Anil Parab : अनिल परब यांना दिलासा; साई रिसॉर्ट प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर!

अमित शहा यांच्यासाठी सोहराबुद्दीन शेख प्रकरणामध्ये मी उभा राहीलो नव्हतो, तर त्या प्रकणात बाकीचे लोकं होते. त्यांच्यासाठी मी त्यामध्ये उभा राहिलो होतो, असे लळीत यांनी स्पष्ट केले. लळीत यांनी या मुलाखतीमध्ये अनेक प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र व्यासपीठावर का आले होते. याचेही उत्तर दिले. ते म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्रमासाठी मी आलो होतो. तेव्हा ते मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते.

Uday Lalit
पालिका आयुक्तांचा दणका; तीन कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता

सोहराबुद्दीन चकमक प्रकरण नेमके काय होते? :

सोहराबुद्दीन चकमक हे प्रकरण गुजरातमधील अहमदाबाद येथील आहे. कथित बनावट चकमकीत सोहराबुद्दीन शेख आणि त्यांच्या पत्नीला ठार करण्यात आल्याचा आरोप होता. 26 नोव्हेंबर 2005 ला ही घटना घडली होती. त्यानंतर या प्रकरणाचा सीबीआयमार्फत (CBI) तपास करण्यात आला. तर सीबीआयच्या विशेष कोर्टाने या प्रकरणातील 22 आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in