काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्याला ममतांनी काही तासांतच लावलं गळाला

आसाममध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार रिपुन बोरा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्याला ममतांनी काही तासांतच लावलं गळाला
Ripun Ghosh and Abhishek BanerjeeSarkarnama

गुवाहाटी : आसाममध्ये (Assam) काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार रिपुन बोरा (Ripun Bora) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. राज्यातील पक्षांतर्गत वादावर बोट ठेवत त्यांनी पक्ष सोडला. त्यानंतर काही तासांतच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी त्यांना गळाला लावले. बोरा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे.

बोरा यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना राजीनामा पाठवला. यामध्ये त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. बोरा हे राज्यसभेचे खासदार होते. त्यांची मुदत संपल्यानंतर त्यांना काँग्रेसकडून (Congress) पुन्हा संधी देण्यात आली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आसाममध्ये राज्यसभेच्या (Rajya Sabha) दोन जागांसाठी निवडणूक झाली. यातील एक जागा बिनविरोध झाली तर एका जागेसाठी मतदान झाले. या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सिद्दीकी अहमद यांनी हा प्रकार केला आहे. काँग्रेसचे उमेदवार रिपुन बोरा यांच्या पराभवास अहमद कारणीभूत ठरले. मतपत्रिकेवर अहमद यांना 1 हा आकडा लिहायचा होता. त्याऐवजी अहमद यांनी ‘one’ असे लिहिले. त्यामुळे त्यांचे मत बाद झाले आणि काँग्रेसच्या बोरा यांचा पराभव झाला.

Ripun Ghosh and Abhishek Banerjee
पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपमध्ये धुसफूस; आमदारानं पक्षाची सर्व पदं सोडली

या कारणामुळेच बोरा यांनी पक्ष सोडल्याचे सांगितले जात आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काही तासांतच टीएमसीमध्ये प्रवेश केला. पक्षाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांचे स्वागत केले. टीएमसीमध्ये यापूर्वीही काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे. आसनसोलमध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले शत्रुघ्न सिन्हा हे काही महिने काँग्रेसमध्येच होते. त्याआधी सुश्मिता देव, गोव्यातील माजी मुख्यमंत्री फलेरो, तसेच मेघालय, मणिपूर, त्रिपुरा आदी राज्यांतील काँग्रेसच्या नेत्यांनीही टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या पत्रात बोरा यांनी म्हटलं आहे की, 2021 च्या विधानसभा निवडणुकीआधी प्रदेशाध्यक्ष असताना आपण पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न केला. पंचायत निवडणुकीपासून सर्व निवडणुकीमध्ये पक्षाने एकजुटीने भाजपशी लढा दिला. पण 2021 च्या निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. केवळ पक्षातील काही नेत्यांच्या स्वार्थापोटी पक्षाचा पराभव झाला. भाजपशी लढण्याऐवजी नेते आपआपसांतच लढत आहेत, असा आरोप बोरा यांनी केला आहे.

Ripun Ghosh and Abhishek Banerjee
जुन्या मित्रामुळं भाजपला पोटनिवडणुकीत बसला झटका!

राज्यसभेच्या निवडणुकीतही काही नेत्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे भाजपला दोन्ही जागा मिळाल्या. प्रदेश काँग्रेस आणि भाजप (BJP) सरकार प्रामुख्याने मुख्यमंत्री हातात हात घालून काम करत आहेत. अशा स्थितीत मी पक्षात राहू शकत नाही. भाजपच्या राजकारणामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. मी यापुढेही भाजपविरोधात लढत राहणार आहे, असं स्पष्ट करत बोरा यांनी राजीनामा देत असल्याचे पत्रात म्हटलं आहे.

आसाममध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे पवित्र मार्गरिटा हे बिनविरोध निवडून आले. दुसऱ्या जागेसाठी भाजप आघाडीकडून युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल पक्षाचे राँग्वरा नार्झरे हे मैदानात उतरले होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसने बोरा यांना उतरवले होते. आसाम विधानसभेतील एकूण 126 मतांपैकी 83 मते भाजप आणि सहकारी पक्षांकडे होती. ही मते मार्गरिटा यांना निवडून आणण्यास पुरेशी होती. दुसऱ्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी 43 मते आवश्यक होती. काँग्रेससह विरोधी पक्षांकडे 44 मते होती. परंतु, अहमद यांनी त्यांचे मत वाया घालवले. यामुळे अखेर बोरा यांचा पराभव झाला आणि भाजपने दुसरी जागाही जिंकली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.