Satyendra Jain Bail Granted: आप'चे नेते सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर;पण न्यायालयाने घातल्या 'या' अटी

जैन यांना 31 मे 2022 रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली होती.
Satyendra Jain Bail Granted:
Satyendra Jain Bail Granted:Sakarnama

: दिल्लीचे माजी मंत्री उपमुख्यमंत्री सत्येंद्र जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सत्येंद्र जैन यांना वैद्यकीय कारणास्तव ६ आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अंतरिम जामीनासोबतच सर्वोच्च न्यायालयानेही अट घातली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सत्येंद्र जैन यांना दिल्ली (Delhi Politics) सोडता येणार नाही, कोणत्याही साक्षीदारालाही भेटू शकणार नाहीत, तसेच, माध्यमांसमोर कोणतेही वक्तव्य करु नयेत, या अटींवर जैन यांना जामीन देण्यात आला आहे.

Satyendra Jain Bail Granted:
Rahul Gandhi : मोठी बातमी : खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना मोठा दिलासा ; तीन वर्षांसाठी न्यायालयाने..

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयानंतर जैन जवळपास वर्षभरानंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत. गुरुवारी (२५ मे) सत्येंद्र जैन यांना चक्कर आल्याने ते शौचालयात पडले. यानंतर त्यांना सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. यापुर्वीही एकदा जैन शौचालयात पडले होते. त्यांना पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती. जैन खूप अशक्त झाले असून त्यांना चालायलाही त्रास होत, असल्याचा दावा पक्षाने केला आहे. त्यांच्या पाठ, डावा पाय आणि खांद्याला प्रचंड वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना डीडीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे जैन यांनाही सोमवारी सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले होते.

माजी मंत्री मनी लाँड्रिंग प्रकरणी तिहार तुरुंगात बंद आहेत. जैन (Satyendra Jain) यांना 31 मे 2022 रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली होती. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणी दरम्यान, माजी मंत्री यांचे 35 किलो वजन कमी झाले असून त्यांना अनेक आजारांनी ग्रासले असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत सत्येंद्र जैन यांचे वकील ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयाला दिली होती.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com