75 वर्षात पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाची परेड उशिरा सुरु होणार!

या वर्षी पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाची परेड (republic day parade) आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम निर्धारित वेळेपासून 30 मिनिटे उशिरा सुरू होणार आहे
Republic Day Parade Updates
Republic Day Parade Updates

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत (Delhi) 75 व्या प्रजासत्ताक दिनाची (Republic Day) तयारी जोरात सुरू झाली आहे. प्रत्येक भारतीयाचे मन स्वातंत्र्याच्या उत्सवासाठी उत्साह आणि जल्लोषाने भरलेले असते. मात्र या वर्षी पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनी परेड (republic day parade) आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम निर्धारित वेळेपासून 30 मिनिटे उशिरा सुरू होणार आहे. 75 वर्षात पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाची परेड सकाळी 10 वाजता नियोजित वेळेत सुरू होणार नसल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. (Republic day latest news)

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी प्रजासत्ताक दिनाची परेड सकाळी 10 वाजता सुरू व्हायची, पण यंदा ती सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम सुरु करण्यापूर्वी देशातील कोरोना निर्बंधानुसार जम्मू-काश्मीरच्या हुतात्मा सुरक्षा जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाची प्रजासत्ताक दिनाची परेड 30 मिनिटांच्या विलंबाने सुरू होईल.

Republic Day Parade Updates
या देशात एकच मोदी नाही, तर नीरव आणि ललित मोदीसारखे पळपुटेही आहेत...

'परेड सोहळा दरवर्षीप्रमाणे ९० मिनिटांचा असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया गेटजवळील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देतील. त्यानंतर देशातील संरक्षण दलाची प्रजासत्ताक दिनाची परेड होईल. यानंतर विविध राज्यातील चित्ररथ सांस्कृतिक विविधता, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचे प्रतिनिधित्व करतील.

कोविड-19 निर्बंध कायम राहतील

प्रजासत्ताक दिनाच्या परेड नंतर सार्वजनिक प्रदर्शनासाठी चित्ररथ लाल किल्ल्यापर्यंत जातील. परंतु कोविड-19 संबंधित निर्बंधांमुळे मार्चिंग परेज नॅशनल स्टेडियमवरच थांबतील. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कार्यक्रमात परफॉर्म करणाऱ्या कलाकारांना कोणालाही भेटू दिले जाणार नाही. देशातील कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे पाहता, सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लोकांना कोविड-19 च्या नियमांची विशेष काळजी घ्यावी लागेल. हे सर्वजण सॅनिटाइज्ड वाहनातून प्रवास करतील आणि संसर्ग होऊ नये म्हणून दूरदूर राहतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com