Mukhtar-Afzal Ansari Conviction: मुख्तार अन्सारीला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Crime News| मुख्तार अन्सारी आणि अफजल अन्सारी यांच्या विरुद्ध 2007 मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
Mukhtar-Afzal Ansari Conviction :
Mukhtar-Afzal Ansari Conviction :Sarkarnama

Mukhtar-Afzal Ansari Sentence: माजी आमदार मुख्तार अन्सारी आणि त्याचा भाऊ बसपा खासदार अफजल अन्सारी यांना उत्तर प्रदेशातील गाझीपूरच्या न्यायालयाने यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच दंडही ठोठावला आहे. मुख्तारला 10 वर्षांची शिक्षा आणि 5 लाख रुपयांचा दंड आणि त्याचा भाऊ अफजलला 4 वर्षांची शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. (Five-time elected Mukhtar Ansari sentenced to 10 years in prison; Read what is the case)

कोण आहे मुख्तार अन्सारी, काय आहे प्रकरण ?

मुख्तार अन्सारी आणि अफजल अन्सारी यांच्या विरुद्ध उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील मुहम्मदाबाद पोलीस ठाण्यात 2007 मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते.

22 नोव्हेंबर 2007 रोजी सरकारी वकील नीरज श्रीवास्तव यांनी गाझीपूर जिल्ह्यातील मोहम्मदाबाद कोतवाली येथे गँगस्टरच्या यादीत खासदार अफजल अन्सारी आणि मुख्तार अन्सारी यांचा समावेश करून गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. (Crime News)

Mukhtar-Afzal Ansari Conviction :
Brijbhushan Singh : ब्रृजभूषण सिंग राजीनाम्यास तयार, कुस्तीपटूंची अटकेची मागणी; आता लढाई आरपारची !

23 सप्टेंबर 2022 रोजी दोघांविरुद्ध प्रथमदर्शनी दोघांवरील आरोप निश्चित करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. शनिवारी (२९ एप्रिल) या प्रकरणी न्यायालयाने मुख्तार अन्सारी आणि अफजल यांना शिक्षा सुनावली.

भाजप आमदार कृष्णानंद राय आणि नंदकिशोर गुप्ता रुंगटा यांच्या हत्येप्रकरणी मुख्तारवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर कृष्णानंद राय यांच्या हत्येप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आधारे त्याचा भाऊ अफजल याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Political news)

Mukhtar-Afzal Ansari Conviction :
BrijBhushan Singh News : भाजप खासदाराने मानले राज ठाकरेंचे आभार ; म्हणाले, '..तो विषय आता..'

2007 मध्ये मुख्तार अन्सारी आणि त्याचा भाऊ अफजल अन्सारी यांच्याशिवाय त्याचा मेहुणा एजाझुल हक यांच्यावरही गँगस्टर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण एजाजुल हक याचे निधन झाले आहे.

29 नोव्हेंबर 2005 रोजी भाजप आमदार कृष्णानंद राय यांची हत्या झाली होती. मोहम्मदाबादमधील बसनिया चट्टी येथे गोळ्या झाडून कृष्णानंद राय यांच्यासह सात जणांचा मृत्यू झाला. या हत्याकांडात AK-47 चाही वापर करण्यात आला होता.

गँगस्टर ऍक्ट प्रकरणी 2012 मध्ये खटला सुरू झाला. 23 सप्टेंबर 2022 रोजी प्रथमदर्शनी आरोप निश्चित करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी या वर्षी १ एप्रिल रोजी पूर्ण झाली. यापूर्वी 15 एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार होती, मात्र पीठासीन अधिकारी रजेवर असल्याने निकाल पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर २९ एप्रिल ही निकालाची तारीख निश्चित करण्यात आली.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com