विरोधकांना धक्का! पाच आमदारांना निलंबित केलं अन् थेट उचलून सभागृहाबाहेर काढलं

विधानसभेच्या अधिवेशनात आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांत जोरदार खडाजंगी झाली.
Assembly Session
Assembly SessionSarkarnama

अमरावती : विधानसभेच्या अधिवेशनात (Assembly Session) आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांत जोरदार खडाजंगी झाली. विषारी दारू पिऊन झालेल्या मृत्यूंप्रकरणी तेलगू देसम पक्षाच्या (TDP) सदस्यांनी विधिमंडळात आवाज उठवला. त्यांनी या मुद्द्यावरून सभागृहात गोंधळ घालण्यास सुरवात केली. यामुळे विधानसभा अध्यक्षांनी अखेर टीडीपीच्या पाच आमदारांना निलंबित केले. या आमदारांना अखेर मार्शलनी उचलून सभागृहाबाहेर काढले. यावरुन आता सत्ताधारी वायएसआर काँग्रेस (YSR Congress) विरुद्ध टीडीपी अशा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.

आंध्र प्रदेशच्या (Andra Pradesh) विधिमंडळात आज चर्चा सुरू असताना टीडीपीच्या सदस्यांनी कामकाजात गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यांनी अर्थसंकल्पावरील चर्चा रोखून धरली. जगनारेड्डीगुडेम येथे विषारी ताडी पिऊन झालेल्या मृत्यूंची चर्चा करण्याचा मागणी त्यांनी लावून धरली. यावर आरोग्यमंत्री अल्ला काली कृष्णा श्रीनिवास यांनी निवेदन देण्याची तयारी दर्शवली. यावरही टीडीपीच्या आमदारांनी गोंधळ कायम ठेवला. त्यांनी अध्यक्ष तम्मिनेनी सीताराम यांच्यासमोर धाव घेतली. त्यांनी अर्थसंकल्पाची कागदपत्रे फाड़ून सभागृहात भिरकावली.

Assembly Session
तुम्ही व्हीआयपी नाही! शेअर बाजाराच्या माजी प्रमुखांना न्यायालयानं सुनावलं

यानंतर सभागृहातील परिस्थिती गंभीर बनली. अखेर विधानसभा अध्यक्षांनी टीडीपीच्या पाच आमदारांना निलंबित केले. यात के. अचननायडू, जी.बुचय्या चौधरी, पाय्यवुला केशव, एन. रामा नायडू आणि डी.बाला वीरांजनेय स्वामी या आमदारांचा समावेश आहे. या आमदारांचे निलंबन अर्थसंकल्पी अधिवेशन संपेपर्यंत कायम राहणार आहे. त्यांना अधिवेशन संपेपर्यंत विधिमंडळात प्रवेश करता येणार नाही. निलंबनानंतरही टीडीपीच्या आमदारांनी सभागृहातून बाहेर जाण्यास नकार दिला. जनतेच्या हिताच्या मुद्द्यावर आधी चर्चा व्हावी, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. ते विधानसभा अध्यक्षांच्या पोडिमयवरही चढले. अखेर विधानसभा अध्यक्षांनी मार्शलना पाचारण केले. मार्शनली या आमदाराला उचलून सभागृहाबाहेर काढले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com