विधानसभा निवडणुकीपूर्वी पाचशे डॉक्टरांनी केला भाजपमध्ये प्रवेश

गुजरातमध्ये भाजपने गेल्या २७ वर्षांत सत्ता गमावलेली नाही.
विधानसभा निवडणुकीपूर्वी पाचशे डॉक्टरांनी केला भाजपमध्ये प्रवेश
BJP, Gujrat Latest NewsSarkarnama

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुका (Assembly elections) तोंडावर आलेल्या गुजरातमध्ये (Gujrat) भारतीय जनता पक्षाने (BJP) सत्तावापसीच्या दृष्टीने प्रयत्न वाढविले आहेत. गेली सुमारे तीन दशके भाजपने हे राज्य गमावलेले नाही. निवडणुकीपूर्वी गुजरातमधील सुमारे ५०० डॉक्टरांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) आणि प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील (C.R.Patil) यांच्या उपस्थितीत काल गांधीनगरमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे. डॉक्टरांनी इतक्या मोठ्या संख्येने भाजपवासी होण्याच्या या घटनेमुळे गुजरातमध्ये भाजपची ताकद आणखी वाढल्याचे मानलं जात आहे.

BJP, Gujrat Latest News
माझं कुटुंब पहिलं असेल..! जनगणनेबाबत अमित शहांची मोठी घोषणा

गुजरातमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना भाजपने वेग दिला आहे. समाजातील प्रत्येक घटकांचा मोठा पाठिंबा भाजपाला आहे हे दाखविण्याचे पक्षाचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये सत्ता कायम राखण्यात भाजपला यश मिळाल्यावर दुसऱ्याच दिवसापासून भाजपने गुजरात, हिमाचल प्रदेशाच्या निवडणुकांची तयारी सुरू केली होती. पंतप्रधान स्वतःच गांधीनगरमध्ये पोचल्यावर कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी वाढला. या राज्यात भाजपने गेल्या २७ वर्षांत सत्ता गमावलेली नाही. आता तर भाजपचे सर्वेसर्वा नेतृत्वच गुजरातमधील असल्याने येथील विधानसभा निवडणुका भाजपसाठी कमालीच्या प्रतिष्ठेचा विषय ठरत आल्या आहेत.

कॉंग्रेसमध्ये आऊटगोईंग सुरू असताना दिल्ली व पंजाबातील सत्तारूढ आम आदमी पक्षानेही यंदा गुजरातमध्ये हातपाय पसरण्याची जोरदार धडपड चालविली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या दोन महिन्यात दोनदा गुजरातचा दौरा केला आहे. येत्या काही महिन्यात मोदी पुन्हा गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भाजपने ४ मे पासून पुढचे ६ महिने न थांबता काम करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना याआधीच दिले आहेत.

BJP, Gujrat Latest News
पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात, माझे कपडे विकेन पण गहू महाग होऊ देणार नाही!

सी. आर. पाटील म्हणाले की, कार्यकर्ते सक्रिय राहावेत, अशी आमची इच्छा आहे. १ मे ते ४ मे या दिवसांत सुट्या असल्याने आम्ही त्यानंतर म्हणजे ४ मे पासून ६ महिने सर्व कार्यकर्त्यांनी न थांबता काम करायचे आहे, अशा सूचना प्रदेश भाजपने दिल्या आहेत. बूथपातळीपर्यंत पक्षाची भक्कम असलेली यंत्रणा आणखी बळकट करण्यावर भाजपचा भर राहील असेही पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.