तुम्ही अजूनही फिट कसे दिसता? असं आमदारांनी विचारताच जावडेकरांनी उघड केलं गुपित

राज्यातील पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांसाठी (MLA) संसदेत दोन दिवसांची कार्यशाळा झाली.
Prakash Javdekar
Prakash JavdekarSarkarnama

नवी दिल्ली : सत्तरी ओलांडलेले भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) हे अजूनही फिट कसे दिसतात, हा प्रश्न दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या महाराष्ट्रातील आमदारांना पडला. त्यांनी थेट जावडेकरांनाच याबाबत विचारणा केली. या वेळी त्यांनी आपल्या तंदुरुस्तीचे रहस्य उघड करीत नवीन आमदारांना मार्गदर्शन करून मोलाचा सल्लाही दिला. आहारावर नियंत्रण आणि नियमितपणे चालण्याचा व्यायाम या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

नवीन आमदारांनी, तुमच्या तंदुरूस्तीचे रहस्य काय, असे विचारल्यावर जावडेकर यांनी आहारावर नियंत्रण आणि नियमितपणे चालण्याचा व्यायाम असे उत्तर दिले. जावडेकर दिल्लीत आल्यापासून म्हणजे किमान १५ वर्षे रोज किमान ३ ते ४ किलोमीटर चालतात. महादेव रस्ता, कुशक रस्ता, नेहरू गार्डन अशी ठिकाणे बदलली तरी जावडेकर यांनी सकाळ-संध्याकाळ चालण्याचा नियम मोडलेला नाही. अगदी प्रवासात असलो तरी ज्या स्थानकावर गाडी जास्त थांबते तेथे उतरून गाडीच्या बाहेर फेऱ्या मारतो, असाही अनुभव त्यांनी सांगितला.

Prakash Javdekar
पहिल्यांदाच आमदार-मंत्री बनलेल्या आदिती तटकरे संसदेत पोचल्या अन्...

राज्यातील पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांसाठी (MLA) संसदेत दोन दिवसांची कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत ८८ आमदार सहभागी झाले. संसदीय प्रशिक्षण, संदर्भ व प्रशिक्षण विभाग (बीपीएसटी) आणि विधिमंडळाचे वि. स.पागे संसदीय संशोधन केंद्र यांच्या वतीने ही कार्यशाळा घेण्यात आली. यासाठी १२० आमदारांनी नोंदणी केली होतीव त्यातील ८८ आमदार यात सहभागी झाले होते. या कार्यशाळेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड, रामदास आठवले यांच्यासह माजी मंत्री प्रकाश जावडेकर व अरविंद सावंत तसेच कुमार केतकर, प्रियांका चतुर्वेदी या लोकप्रतिनिधींनी दिल्लीतील आपले अनुभवही राज्याच्या आमदारांबरोबर शेअर केले.

Prakash Javdekar
परळ एसटी डेपोत आढळला कर्मचाऱ्याचा मृतदेह तर आंदोलनातील चौघे बेपत्ता असल्याचा दावा

तसेच, लोकसभेतील अभ्यासू खासदार भर्तुहरी माहताब व मनोज झा यांनीही या आमदारांशी संवाद साधला. प्रश्नोत्तराचा तास, संसदीय लोकशाहीचा गाभा, जागतिक तापमानवाढीवर भारत सरकार व संसद सदस्यांची भूमिका यावर त्यांनी मार्गदर्शन झाले. पहिल्यांदाच निवडून आलेले व मंत्री झालेले राज्यातील ४ आमदार असून, त्यातील आदिती तटकरे (Aditi Tatkare) या एकमेव मंत्री दिल्लीच्या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी सर्व सत्रांना हजेरी लावली आणि व्याख्यानांच्या वेळी नोटस् घेणाऱया आदिती तटकरेही यानिमित्ताने दिसल्या. त्यांनी या कार्यशाळेतील अनुभवही सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com