म्युकरमायकोसिसचा रुग्ण दीड कोटी खर्च करुन अन् एक डोळा गमावून अखेर लढाई जिंकला

ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकरमायकोसिस या आजाराच्या उपचारावरील खर्च खूप मोठा असल्याने रुग्णांवर आर्थिक संकट कोसळत आहे.
first patients of mucormycosis in vidarbha spends crore for treatment
first patients of mucormycosis in vidarbha spends crore for treatment

नवी दिल्ली : ब्लॅक फंगस (Black Fungus) म्हणजेच म्युकरमायकोसिस (Mucormycosis) हा जीवघेणा आजार कोरोनातून (Covid19) बरे झालेल्या रुग्णांना (Patient) होत आहे. या आजाराच्या उपचारावरील (treatment) खर्च खूप मोठा असल्याने रुग्णांवर आर्थिक संकट कोसळत आहे. या आजाराच्या विदर्भातील पहिल्या रुग्णाला उपचारासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च करावे लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याचबरोबर त्याला डोळाही गमावावा लागला आहे. 

देशात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यातील सर्वांत मोठी अडचण ही अॅम्फोटेरिसीन-बी इंजेक्शनच्या टंचाईची आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना रुग्णांच्या प्रमाणात इंजेक्शन दिली जात आहेत. परंतु, ही इंजेक्शन अपुरी पडत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. एका रुग्णाला बरे होण्यासाठी सुमारे 50 ते 100 इंजेक्शन लागतात. एका इंजेक्शनची किंमत 6 ते 8 हजार आहे. म्हणजेच हा खर्च काही लाखांच्या घरात जातो. 

नवीन पॉल हे विदर्भातील म्युकरमायकोसिसचे पहिले रुग्ण ठरले होते. त्यांच्या उपचाराचा खर्च तब्बल दीड कोटींवर गेल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. या वृत्तानुसार, पॉल हे सरकारी कर्मचारी आहेत. ते नागपूरचे रहिवासी आहेत. त्यांना सप्टेंबर महिन्यात कोरोनाची बाधा झाली. नंतर त्यांना दात आणि डोळ्याला त्रास जाणवू लागला. त्यावेळी हा आजार नवीन होता. पॉल यांनी ऑक्टोबरपासून याची लक्षणे जाणवत होती. 

पॉल यांच्यावर फेब्रुवारी महिन्यात शस्त्रक्रिया करुन त्यांचा डावा डोळा काढून टाकण्यात आला. त्यांच्यावर सहा रुग्णालयांत उपचार करण्यात आले. याचबरोबर शस्त्रक्रिया करुन डावा डोळा काढून टाकण्याआधी त्यांच्या 13 वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी पॉल यांना 1.48 कोटी रुपयांचा खर्च आला. त्यांची पत्नी रेल्वेच्या सेवेत असल्याने त्यांना उपचारासाठी 1 कोटी रुपये मिळाले. उरलेले 48 कोटी रुपये दुसरीकडून जमा करावे लागले. 

याविषयी बोलताना पॉल म्हणाले की, सुरवातीला माझ्या डोळे आणि दाताला त्रास जाणवू लागला. मी नागपूरमधील रुग्णालयात दाखल होतो. नंतर मला हैदराबादमधील रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर पुन्हा नागपूरला हलवण्यात आले. तेथून माझी मुंबईला रवानगी झालीय मुंबईतील हॉस्पिटलने 19 लाख रुपयांचे बिल केल्याने मी पुन्हा नागपूरला परतलो. नंतर शस्त्रक्रिया करुन माझा डोळा काढून टाकण्यात आला. 

कोरोनातून बरे झालेले रुग्ण आधीच उपचारासाठी खर्च केल्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेले असतात. यातच म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यासह कुटुंबीयांसमोर मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. एक तर इंजेक्शन मिळत नाही आणि मिळाले तरी परवडत नाही, अशी अवस्था अनेकांची होत आहे. रुग्णावर उपचारासाठी इंजेक्शनसाठीच किमान 3 ते 4 लाख रुपयांचा खर्च होत आहे. गरीब रुग्णांना हा खर्च परवडण्यासारखा नाही. 

देशातील अनेक राज्यांनी याला साथीचा रोग जाहीर केला आहे. यामुळे सरकारी रुग्णालयात यावरील उपचार मोफत होतात. परंतु, खासगी रुग्णालयात यावर उपचारासाठी मोठा खर्च हत आहे. खासगी रुग्णालयात एका रुग्णाचे बिल 10 ते 15 लाख रुपये होत आहे. परंतु, हे सगळ्यांनाच परवडण्यासारखे नाही. महागडे उपचार परवडू शकत नाहीत अशा रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आपल्या रुग्णाचा हा जीवघेणा आजार बळी घेत असताना त्याच्या कुटुंबीयांसमोर असहायपणे पाहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in