देशात ओमिक्रॉनने घेतला पहिला बळी!

कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकारामुळे देशात आता तिसरी लाट (Third Wave) आली आहे.
Omicron

Omicron

Sarkarnama

नवी दिल्ली : कोरोना (Covid-19) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराने आता डोके वर काढलं आहे. देशात डेल्टाच्या जागी आता ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. कोरोना रुग्णसंख्याही अतिशय वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशात तिसरी लाट (Third Wave) आल्याची माहिती सरकारी पातळीवरून देण्यात आली आहे. आता देशात ओमिक्रॉनमुळे झालेला पहिला मृत्यू नोंदवण्यात आला आहे.

राजस्थानमध्ये हा मृत्यू नोंदवण्यात आला आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये हा मृत्यू झाला आहे. ओमिक्रॉनमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वय 73 वर्षे होते. त्याचा कोरोना चाचणी अहवाल 15 डिसेंबरला पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. या व्यक्तीला मधुमेह, रक्तदाबासह अन्य विकार होते. त्याचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या तपासणीचा अहवाल 25 डिसेंबरला मिळाल्यानंतर त्याला ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, त्याचा कोरोना चाचणी अहवाल 21 डिसेंबरला निगेटिव्ह आला होता. उपचारादरम्यान 31 डिसेंबरला त्याचा मृत्यू झाला.

<div class="paragraphs"><p>Omicron</p></div>
सरसेनाध्यक्ष रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताला वैमानिकाची चूक कारणीभूत?

केंद्र सरकारच्या कोरोना लसीकरणविषयक टास्क फोर्सचे प्रमुख डॉ.व्ही.के.अरोरा यांनीच देशात तिसरी लाट आल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, देशातील ओमिक्रॉन रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. महानगरांमध्ये दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी 75 टक्के रुग्ण हे ओमिक्रॉनचे आहेत. मुंबई, दिल्ली आणि कोलकता या शहरांमधील 75 टक्के रुग्ण ओमिक्रॉनचे आहेत.

<div class="paragraphs"><p>Omicron</p></div>
राजकारण पेटलं! उमेदवारी मिळण्याआधीच बड्या नेत्याची हत्या

नॅशनल कोविड-19 सुपरमॉडेल कमिटीने तिसरी लाट नवीन वर्षाच्या सुरवातीला येईल, असा अंदाज वर्तवला होता. या कमिटीचे अध्यक्ष विद्यासागर यांनी म्हटले होते की, भारतात ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. परंतु, ही लाट दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य असेल. तिसरी लाट भारतात पुढील वर्षीच्या सुरवातीला येईल. ही लाट फेब्रुवारी महिन्यात उच्चांकी पातळीवर पोचेल. सध्या देशात दररोज कोरोनाचे साडेसात हजार रुग्ण सापडत आहेत. डेल्टाच्या जागा ओमिक्रॉनने घेतल्यानंतर ही संख्या वाढेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com