जगनमोहन यांना धक्का; मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच माजी गृहमंत्र्यांचा आमदाकीचाही राजीनामा

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नव्या मंत्रिमंडळाचा सोमवारी शपथविधी पार पडला.
जगनमोहन यांना धक्का; मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच माजी गृहमंत्र्यांचा आमदाकीचाही राजीनामा
Jagan Mohan Reddy, M. SucharitaSarkarnama

अमरावती (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या नव्या मंत्रिमंडळाचा सोमवारी शपथविधी पार पडला. त्यांनी अर्धे मंत्रिमंडळ (Cabinet) घरी बसवले असून मंत्रिमंडळात 14 नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. मंत्रिमंडळातील डच्चू दिलेल्या मंत्र्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकासह पहिल्या दलित गृहमंत्र्यांचाही समावेश आहे.

मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या आमदारांमधील (MLA) नाराजी आता बाहेर येऊ लागली आहे. शपथविधी आधीपासूनच राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. एम. सुचरिता या राज्याच्या पहिल्या दलित गृहमंत्री होत्या. त्यांनीही खाली बसवण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर त्यांनी सोमवारी आमदारकीचाही राजीनामा दिला. मात्र, त्यांनी आपला राजीनामा राज्यसभेचे खासदार मोपीदेवी वेंकटरमणा यांच्याकडे सुपुर्द केला आहे. पण त्या पक्षातच राहणार असल्याचे मुलीने स्पष्ट केले.

Jagan Mohan Reddy, M. Sucharita
नाट्यमय घडामोडींनंतर पाकिस्तानात पुन्हा 'शरीफ'राज

आणखी दोन आमदारांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला जोरदार विरोध केला. जगनमोहन यांनी त्यांचे नातेवाईक बालीनेनी श्रीनिवास रेड्डी यांचं मंत्रिपदही काढून घेतलं आहे. त्यांनीही आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. ते सोमवारीच मुख्यमंत्र्यांना याबाबत भेटणार असल्याचे समजते. त्यांच्या समर्थकांनी मतदारसंघात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election) जगनमोहन यांनी दिलेला शब्द करून दाखवला आहे. मंत्रिमंडळात नेत्यांचा समावेश करताना त्यांनी हे मंत्रिमंडळ दोन ते अडीच वर्षांचेच असेल, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर इतर आमदारांना संधी दिली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार मागील आठवड्यात गुरूवारी त्यांनी सर्व मंत्र्याचे राजीनामे घेतले. आज नव्या मंत्रिमंडळातील 25 मंत्र्यांचा शपथविधी झाला.

Jagan Mohan Reddy, M. Sucharita
जगनमोहन यांनी अर्धे मंत्रिमंडळ बसवलं घरी; चौदा नवीन चेहऱ्यांना बनवलं मंत्री

जुन्या मंत्रिमंडळातील 11 जणांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळात त्यांनी सोशल इंजिनिअरिंग केल्याची चर्चा आहे. मागासवर्गीय समाजाला सर्वाधिक प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे. त्यानुसार 25 जणांमध्ये 16 मंत्री हे अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्यांक आणि इतर मागासवर्ग समाजातील आहेत. आधीच्या मंत्रिमंडळात 56 टक्के मंत्री मागासवर्गीय होते. आता ही टक्केवारी 68 वर पोहचली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in