मेरठमध्ये ओवेसींच्या गाडीवर चार राऊंड फायर

एमआयएम (MIM) पक्षही उत्तरप्रदेशात निवडणुकीत (UP Election-2022) उतरला असून ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे.
Asaduddin Owaisi
Asaduddin OwaisiSarkarnama

मेरठ : उत्तर प्रदेशात आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी आलेले एमआयएमचे (MIM) अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या गाडीवर गोळीबार झाला आहे. ओवेसी हे मेरठ येथून दिल्लीकडे जात असतांना एका टोलनाक्याजवळ त्यांच्या मोटार गाडीवर तीन ते चार हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या असून या हल्ल्यात ओवेसी यांना कोणतीही इजा झालेली नाही. याबाबत खुद्द ओवेसींनीच ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

Asaduddin Owaisi
PMC Bank Scam: मुख्य आरोपीचा डाव फसला, नेपाळ सीमेपासून अवघ्या 200 मीटर अलिकडे पकडले

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीमुळे रणधुमाळी रंगली आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांनी झोकून दिले असून जोरात प्रचारास सुरूवात केली आहे. येथील निवडणुकीत ओवेसी याचा एमआयएम पक्षही उतरला असून ओवेसी यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. आज (ता.3 फेब्रुवारी) ते मेरठमधील किठौर येथे प्रचारासाठी आले होते. तेथील कार्यक्रम आटोपून ते दिल्लीकडे जात असतानाच त्यांना अज्ञात हल्लेखोरांनी लक्ष्य केले. त्यांच्या गाडीवर तीन ते चार हल्लेखोरांनी हल्ला करत त्यांच्यावर गोळीबार केला आहे. याबाबतची माहिती ही खुद्द ओवेसींनी दिली असून या हल्ल्यात कुणालाही काही इजा झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Asaduddin Owaisi
अँटिलिया प्रकरण अन् मनसुख हिरेन हत्येचे गूढ अखेर उलगडणार

आपल्या ट्वीटमध्ये ओवेसी म्हणाले की, काही वेळा आधी छिजारसी टोल नाक्यावर माझ्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. 3-4 लोकांकडून 4 राउंड फ़ायरींग करण्यात आली. सर्वजन हत्यारे जागीच ठेवत पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली होती. मात्र, मी दुसऱ्या गाडीने येथून निगालो आहे. कुणाला कोणतीच इजा झालेली नाही. आम्ही सर्वजण सुखरूप आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com