Karnataka Election : वडिलांना भाजपचं तिकीट मिळालं अन् मुलाचा गोळीबार; काय घडलं नेमकं?

Karnataka BJP : भाजप गुंडांना उमेदवारी देत असल्याचा काँग्रेसचा हल्लाबोल
BJP Son Fire
BJP Son FireSarkarnama

Karnataka Congress vs BJP : विजापूर जिल्ह्यातील बाबलेश्वर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजू गौडा यांच्या मुलाचा प्रताप समोर आला आहे. विजू गौडा यांना भाजपचे तिकिट मिळाल्याच्या आनंदातून त्यांचा मुलगा समर्थने पिस्तुलातून हवेत तीन राऊंड गोळीबार केला.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या प्रकरणावरून विरोधी काँग्रेस पक्षाने भाजपवर जोरदार हल्ला चढविला आहे. भाजपने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिल्याचा आरोप कर्नाटक (Karnataka) काँग्रेसचे प्रवक्ते संगमेश बाबलेश्वर यांनी केला आहे. भाजप गुंडाला पोसत आहे. त्यातून राज्यात दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. (Shot of pistol in air by BJP candidate's son)

BJP Son Fire
Political News : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी मोठी घडामोड; किरेन रिजिजू यांनी घेतली नार्वेकरांची भेट : उद्धव ठाकरे म्हणतात...

विजुगौडा पाटील यांना भाजपकडून तिकीट मिळाले. त्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना त्यांचा मुलगा समर्थ गौडा याने पिस्तुलातून हवेत तीन राऊंड गोळी झाडून विचित्र पध्दतीने साजरा केला. या घटनेचा व्हिडिओ आता व्हिडिओ व्हायरल होत आहे, असा दावा संगमेश यांनी केला आहे.

कर्नाटक काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते संगमेश बाबलेश्वर म्हणाले, "भाजपने विजूगौडा यांना कोणत्या आधारावर तिकीट दिले आहे. भाजपकडून गुंडांना तिकीट दिले जात आहे. राज्यात भाजप गुंडांना पोसत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे."

BJP Son Fire
Chhatrapati Sambhajinagar APMC News : सभापती पदाची माळ पठाडे- देशमुख ? की मग तिसऱ्याच्याच गळ्यात...

समर्थने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष राजू अलगुरु, नेता संगमेश यांनी विजापूर येथे जारी केला. त्यांनी पत्रकार परिषदेत गोळीबाराचा व्हिडिओ दाखवला. बाबळेश्वर मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांकडून दादागिरी सुरू आहे. असे लोक भाजपचे उमेदवार आहेत. भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) आणि इतर नेत्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in