हा तर मोदींचा चीप पब्लिसिटी स्टंट! राकेश टिकैत यांचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पंजाब (Punjab) दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीवरून मोठा गदारोळ सुरू आहे.
हा तर मोदींचा चीप पब्लिसिटी स्टंट! राकेश टिकैत यांचा हल्लाबोल
Rakesh TikaitSarkarnama

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पंजाब (Punjab) दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीवरून मोठा गदारोळ सुरू आहे. मोदींनी या कारणावरून दौरा अर्धवट सोडला होता. यावरून काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP) आरोप-प्रत्यारोपांचा सामना सुरू आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

पंजाबमध्ये मोदींच्या जिवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप भाजपने केला आहे. पंजाबमधील काँग्रेस सरकारने जाणीवपूर्वक मोदींच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी ठेवल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला होता. काँग्रेसने मोदींच्या सभेला गर्दी नसल्यानेच त्यांनी दौरा रद्द करून परत जाणे पसंत केले, असे म्हटले आहे. आता या वादात शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेते राकेश टिकैत यांनी उडी घेतली आहे.

राकेश टिकैत यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान पंजाबमध्ये येणार होते तर त्यांच्या सुरक्षेच्या त्यांनी काय व्यवस्था केली होती? ते मोठ्या हल्ल्यातून बचावले, असा त्यांचा दावा आहे. हा केवळ स्टंट आहे. सवंग मार्गाने सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. केंद्र सरकार सुरक्षेत त्रुटी असल्याचा दावा करतेय. याचवेळी पंजाब सरकार सभेला गर्दी नसल्याने मोदी परत गेले, असे म्हणत आहे. दोघेही स्वत:चे म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पंतप्रधान मोदींनी तिथे जायलाच नको होते.

Rakesh Tikait
कोरोनाचा कहर! देशात संपूर्ण लॉकडाऊनचे चक्र पुन्हा सुरू

फिरोझपूरमध्ये पंतप्रधानांकडून काल (ता.5) विविध प्रकल्पांचे उदघाटन केले जाणार होते. दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम नियोजित होता. त्यासाठी भाजपने जय्यत तयारीही केली होती. त्याआधी पंतप्रधान मोदी हुसेनवाला येथील राष्ट्रीय हुतात्मा स्मारक येथे हेलिकॉप्टरने जाणार होते. पण पावसाळी वातावरणामुळे त्यांनी रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला होता. भटिंडा येथून हा मार्ग दोन तासांचा होता.

Rakesh Tikait
भारतात असुरक्षित वाटत असल्यास पाकिस्तानात जा! कुणाल कामराची गुगली

पंजाब पोलिस महासंचालकांनी सुरक्षा व्यवस्थेची खात्री केल्यानंतर पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा हुसेनवालाच्या दिशेने निघाल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली. हुतात्मा स्मारकापासून 30 किलोमीटर अंतरावरील एका पुलावर वाहनांचा ताफा आल्यानंतर काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे लक्षात आले. त्यामुळे पंतप्रधानांना सुमारे 20 मिनिटे तिथेच थांबावे लागेल. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही मोठी त्रुटी होती, असेही गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक आणि प्रवासाचे नियोजन पंजाब सरकारला आधीच कळवले होते. त्यानुसार राज्य सरकारने सुरक्षा व इतर बाबींची योग्य खबरदारी घेणे आवश्यक होते. सरकारने रस्त्यावरील इतर गोष्टी थांबवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरवणे अपेक्षित होते. पण तसे करण्यात आले नाही. सुरक्षा व्यवस्थेतील या त्रुटींमुळे पंतप्रधानांनी पुन्हा भटिंडा विमानतळाकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.