प्रसिद्ध उर्दू कवी राहत इंदोरी यांचे निधन

प्रसिद्ध उर्दूकवी राहत इंदोरी यांचे आज निधन झाले. इंदोरी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
famous urdu poet rahat indori passes away in hospital
famous urdu poet rahat indori passes away in hospital

इंदोर : प्रसिद्ध उर्दू कवी राहत इंदोरी यांचे आज निधन झाले. इंदोरी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांना हृदय विकाराचे दोन झटके आल्याने त्यांचा मृत्यू झाला. इंदोरी हे 70 वर्षांचे होते.

राहत इंदोरी यांची कोरोना चाचणी रविवारी करण्यात आली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सर अरबिंदो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांना हृदय विकाराचे दोन झटके आले. यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना न्यूमोनियाचा संसर्ग झाला होता, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. 

इंदोरी यांनी कोरोना झाल्याची माहिती आज सकाळी स्वत:च ट्विटरवर दिली होती. त्यांनी म्हटले होते की, कोविडचे प्राथमिक लक्षण दिसून आल्याने माझी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी अरबिंदो रुग्णालयात दाखल झालो आहे. मी या आजारातून लवकरात लवकर बरा व्हावे, यासाठी तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा. कृपया माझ्या घरच्या व्यक्तींना कॉल करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस करु नये. फेसबुक आणि ट्विटरवरुन माझ्या प्रकृतीबद्दल तुम्हाला माहिती मिळत जाईल. 

इंदोरी यांच्या निधनाबद्दल अनेक क्षेत्रातील व्यक्तींना शोक व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे की, आपल्या शायरीतून लाखो-कोटी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे प्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांच्या निधनाने हे मध्य प्रदेशसह संपूर्ण देशाचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळावी. 

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते कमलनाथ यांनी म्हटले आहे की, केवळ मध्य प्रदेश नव्हे तर, संपूर्ण देशाची शान असणाऱ्या राहत साहेबांच्या निधनामुळे मी सुन्न झालो आहे. ते असे अचानक आपल्या सर्वांना सोडून जातील यावर विश्वासच बसत नाही. 

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे की, देशाने एक मोठा शायर गमावला आहे. या प्रसंगी इंदोरी यांच्या कुटुंबीयांना दु:खातून सावरण्यास ईश्वर त्यांना ताकद देवो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 

एआयएमआयएमचे नेते वारीस पठाण यांनीही इंदोरी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, राहत इंदोरी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. त्यांचे कुटुंबीय आणि चाहते यांच्या दु:खात मी सहभागी आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com