चक्क मुख्यमंत्र्यांच्या नावे बनावट व्हॉटस्अप खाते; संशयितास घेतले ताब्यात

GOA|CM Pramod Sawant : खातरजमा करण्यासाठी काहींनी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला असता हा प्रकार उघडकीस आला.
CM Pramod Sawant Latest News
CM Pramod Sawant Latest NewsSarkarnama

पणजी : गोव्याचे (GOA) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr. Pramod Sawant) यांच्या नावे बनावट व्हॉटसॲप (Whatsapp) खाते उघडून राजकीय व्यक्ती तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांना संदेश पाठवून खळबळ माजवून दिलेल्या संशयित सय्यद एजाज (वय ४२) याला औरंगाबाद (Aurangabad) येथून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून संशयिताची चौकशी सुरू असल्याची माहिती सायबर गुन्हे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. (CM Pramod Sawant Latest Marathi News)

CM Pramod Sawant Latest News
video: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा अपघात थोडक्यात बचावला

या बनावट व्हॉटस्अपप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून तक्रार दाखल झाल्यानंतर सायबर गुन्हे विभागाची यंत्रणा गतिमान झाली होती. या विभागाकडे असलेल्या अत्याधुनिक तपास यंत्रणेच्या आधारे हे मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा थांगपत्ता लागला होता. त्याच्यावर सायबर गुन्हे अधिकाऱ्यांनी या यंत्रणेचा वापर करून पाळत ठेवली होती. त्याचा ठोस ठावठिकाणा कळाल्यावर विभागाचे पोलिस पथक औरंगाबाद येथे जाऊन त्याला ताब्यात घेऊन गोव्यात आले आहे. त्याची सखोल चौकशी सुरू आहे. याबाबत माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

CM Pramod Sawant Latest News
चिंता वाढली : कोरोनाची पुन्हा उसळी

दरम्यान, गेल्या मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट व्हॉटस्अपवरून काही लोकांना संदेश पोचले. त्याची खातरजमा करण्यासाठी काहींनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता हा प्रकार उघडकीस आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com