भाजपच्या आमदारावर फेसबुकनं घातली बंदी 

आमदार टी राजा सिंह यांचे फेसबूक अंकाउट बंद केले आहे. टी राजा सिंह यांचे यापूर्वी काही वादगस्त पोस्ट फेसबूकने काढून टाकल्या होत्या.
t taja.jpeg
t taja.jpeg

नवी दिल्ली  : व्देष आणि हिंसात्मक पोस्ट फेसबुकवर शेअर केल्यावरून भाजपचे आमदार टी राजा सिंह यांच्यावर फेसबुकने बंदी घातली आहे. टी राजा सिंह हे तेलंगाना येथील आमदार आहेत. टी राजा सिंह यांनी व्देष आणि हिंसात्मक घटना वाढतील अशा पोस्ट केल्या होत्या. फेसबूकच्या नियमाचे त्यांनी उल्लंघन केल्यामुळे त्यांचे फेसबूक अंकाऊट बंद करण्यात आले असल्याचे फेसबूकच्या प्रवक्यांनी सांगितलं आहे.   

सत्ताधारी भाजप सरकारला फेसबूक सहकार्य करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षानी केला आहे. फेसबूक पक्षपात करीत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. याबाबत वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर फेसबूकने भाजचे नेते आमदार टी राजा सिंह यांचे फेसबूक अंकाउट बंद केले आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या बातमीनुसार यापूर्वी टी राजा सिंह यांच्या काही वादगस्त पोस्ट फेसबूकने काढून टाकल्या होत्या.   

फेसबूकचे भारतातील प्रमुख अजित मोहन यांनी काल संसदीय समितीला ही माहिती दिली. त्यानंतर याबाबत दोन तास चर्चा करण्यात आली. संसदेच्या सोशल मीडिया समितील काँग्रेसच्या सदस्यांनी फेसबूक आणि भाजप यांची मिलीभगत असल्याचा आरोप केला. पण फेसबूकने त्यांचे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.  

नरेंद्र मोदींच्या वेबसाईटचे ट्वीटर अकाऊंट हॅक
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेबसाईटचे ट्वीटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. ट्वीटरच्या प्रवक्त्यानेही ही बाब मान्य केली असून त्याबाबत तपास सुरु असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी जुलै महिन्यात अनेक मान्यवरांची ट्वीटर अकाऊंट हॅक करण्यात आली होती. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार @narendramodi_in हे ट्वीटर अकाऊंट हॅक करण्यात आले. या खात्यावरुन क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून रिलिफ फंडाला निधी देण्याचे आवाहन हॅकर्सनी केले होते. ही ट्वीट आता काढून टाकण्यात आली आहेत. मात्र, त्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. जाॅन विक या नावाच्या व्यक्तीने हे खाते हॅक केल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. 
Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com